नारायणडोहो येथे शासन आपल्या दारी अभियानाचे आयोजन.
नगर तालुक्यातील नारायणडोहो येथे नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होऊन शासनाशी संबंधित कामे करून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.
शासन आपल्या दारी या अभियनांतर्गत नारायणडोहो गावात सर्व नागरिकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये विशेषत: नवीन आधार कार्ड काढणे, आधारकार्डामध्ये दुरुस्ती करणे, नवीन शिधापत्रिका अर्ज स्वीकृती तसेच शिधावाटप पुस्तकावरील नाव कमी करणे व नावे वाढविणे, खराब झालेली शिधापत्रिका बदलणे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग, राष्ट्रीय निवृत्ती सेवा योजना, नवीन मतदार नोंदणी,उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला,जात प्रमाणपत्र,जन्म मृत्यू नोंदणी व विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, दिव्यांगांसाठी युडीआयडी कार्ड नोंदणी करणे, तसेच नारायणडोहो विविध योजना व कोविड प्रतिबंधात्मक लस देखील नागरिकांसाठी (शासन आपल्या दारी) या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
याठिकाणी शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे.महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करणे बी बियाणे, यंत्र औजारे,महात्मा गांधी ग्रामीण योजने अंतर्गत कांदाचाळ योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रकिया योजना बिज प्रकिया क्रमणी किड नियंत्रण ,प्रात्याक्षीत घरगुती पध्दतीने बियाणे उगवण क्षमता तपासणी, या सर्व योजनेवर मार्गदर्शन केले.तरी या अभियानात सहभागी होऊन नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा (शासन आपल्या दारी) लाभ घ्यावा, असे आवाहन साहायक कृषी आधिकारी युवराज शिंगटे यांनी नागरिकांना केले आहे.यावेळी ग्रामसेवक भोंडवे, तलाठी कैलास बहिर, साहय्यक कृषी अधिकारी युवराज शिंगटे,वैद्यकीय अधिकारी दातीर मँडम, पशुवैद्यकीय एस. जी. नवले लोकनियुक्त सरपंच श्रध्दाताई साठे(गुंड)उपसरपंच अनिल कराळे, मा.सरपंच शंकरराव साठे, सदस्य संतोष साठे,दत्ता साठे,भाऊ शिंदे, बाळासाहेब साठे,सोपान जायभाय,गणेश साठे, बाबासाहेब साठे,आबासाहेब साठे,बन्नु साठे,बबन कांगुडे,सुरज साठे,अभिषेक पोपट साठे, पोपट साठे,किशोर गायकवाड,मच्छिंद्र साठे,ऋषिकेश साठे,ग्रामपंचायत सेवा सोसायटी, प्रितम म्हस्के चेअरमन सदस्य, कर्मचारी व आशा सेविका आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा