कामरगाव मधे बालसंस्कार शिबीरात विदयार्थी गिरवतायेत आध्यात्मिक व व्यक्तीमत्व विकासाचे धडे ! .


नगर (हेमंत साठे):- परीक्षा संपल्या...उन्हाळी सुट्ट्या लागल्या कि मुले मन रमवायला मोबाईल, टी.व्ही. मधे तासन् तास गुंतून राहतात. असच काहीस चित्र आजकाल सर्वत्र दिसून येत आहे.

        परंतु नगर तालुक्यातील कामरगाव येथे उन्हाळी सुट्टी मधे मुलांसाठी बालसंस्कार शिबीर हा अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय. बालसंस्कार शिबीरा मधून गावातील विदयार्थ्याना उन्हाळी सुट्टी मधे मोबाईल, टी.व्ही च्या आभासी जगात अडकू न देता. विदयार्थ्यांचे विविध कलागुण व व्यक्तीमत्व विकासाचे धडे देण्यात येत आहेत. या बालसंस्कार शिबीराचे आयोजन गुरुकृपा संगीत विदयालया कडून सदगुरू साधुबाबा मंदिर परिसरात १५ मे ते ३१ मे पर्यंत करण्यात आले आहे.

बालसंस्कार शिबीरातील काही क्षणांचे व्हिडिओ चित्रण👆

या शिबीरामधे गावातील ३० पेक्षा अधिक विद्यार्थ्यानी सहभाग घेतला आहे. बालसंस्कार शिबीरामधे विदयार्थ्याना पहाटे साडे पाच वाजेपासून साडे सहा वाजे पर्यंत योगासनाचे प्रशिक्षण देण्यात येते. तर सकाळी दहा वाजेपासून बारा वाजेपर्यंत शास्त्रीय संगीत प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर विदयार्थ्याचे शालेय अभ्यासातील इंग्लिश व गणित विषयाचे क्लास प्रा.आशा प्रकाश ठोकळ या घेतात. संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत हरिपाठ, किर्तन , साथसंगत मार्गदर्शन व हनुमान चालीसा पाठांतर .इ. उपक्रम आयोजित केले जातात. बालसंस्कार शिबीराचा सांगता समारंभ ३१ मे रोजी होणार असल्याचे ह.भ.प. राम महाराज नानेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. या बालसंस्कार शिबीरासाठी आयोजक  गुरुकृपा संगीत विदयालयाचे संस्थापक ह.भ.प. राम महाराज नानेकर व ह. भ.प. संजय महाराज महापुरे तसेच परमपूज्य सदगुरू साधु बाबा ब्रम्ह संप्रदाय संस्थेचे उत्तराधिकारी ह.भ.प.शामसुंदर महाराज नानेकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. गुरुकृपा संगीत विदयालयातून प्रशिक्षण घेतलेले माजी. विदयार्थी प्रतिक साठे, सौरभ आभाणे, अभिजित गंधे, अनमोल गंधे, प्रतिक थिटे यांचे बालसंस्कार शिबीरास सहकार्य लाभले. 

          कामरगावातील विदयार्थ्यासाठी राबविल्या जाणाऱ्या  बालसंस्कार शिबीर या अभिनव उपक्रमाचे कामरगाव सह पंचक्रोशितून कौतुक होत आहे.

📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !