शुभमंगल जुळवताना सावधान... नगर जिल्ह्यात नवरदेव बोहल्यावर चढण्याआधी जेलमधे !


अहमदनगर ( प्रतिनिधी) : विवाह सोहळा म्हटल कि वधू वर पक्षासाठी आनंदाचा क्षण.  परंतु अहमदनगर जिल्ह्यात एक विवाह सोहळा वेगळयाच कारणामुळे चर्चेत आला आहे. नगर जिल्ह्यातील असाच एक विवाह सोहळा अगदी रंगात आला होता…दोन्ही बाजूकडील नातेवाईकांच्या गर्दीने मंगल कार्यालय खचाखच भरले होते… सर्वत्र लगीन घाई सुरु होती.लग्न घटिका समीप आली होती, परंतु अचानक विवाहस्थळी पोलिसांची एंट्री झाली आणि नवरदेव बोहल्यावर चढण्याऐवजी थेट जेलमध्ये पोहोचला.  या घटनेची जिल्हाभरात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील  राहाता येथील एका मुलीचा विवाह नाशिक मधे राहणाऱ्या पंकज याच्याशी ठरला होता.  राहाता येथील एका मंगल कार्यालयात २१ मे रोजी विवाह असल्याने या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. लग्न घटिका समीप आल्याने दोन्ही बाजूकडील नातेवाईक आणि मित्र परिवाराचा उत्साह शिगेला होता. नवरदेव पंकज वाजतगाजत विवाहस्थळी पोहचला. मात्र तो बोहल्यावर चढण्या अगोदरच त्याची  प्रियसी राहाता पोलिसांसह विवाहस्थळी पोहचली.

पंकज याने लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांत वारंवार शरीरसंबंध ठेवून फसवणूक केल्याचे तिने सांगताच विवाहस्थळी एकच खळबळ उडाली. पंकजचे कारनामे ऐकून नवरीसह तिच्या घरच्यांचा पारा चांगलाच चढला आणि नवरीने तात्काळ विवाहास नकार देत हा विवाह रद्द केला. राहाता पोलिसांनी पंकज याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तरुणीशी संबंध असल्याची कबुली दिली. तक्रारीपूर्वी कलवरे, कलवऱ्या यांच्या गराड्यात दिसणारा  नवरदेव पोलीस स्टेशनला मात्र एकटाच दिसत होता.

पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पंकज याच्यावर भादंवि कलम ३७६ आणि ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आता नाशिकरोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पंकज याला  नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

पंकजने अगोदर त्याच्या प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून चार वर्ष तिची फसवणूक केली, तर राहाता पोलीस वेळीच विवाहस्थळी पोहचल्याने दुसरी मुलगी फसवणूक होण्यापूर्वी वाचली आणि बोहल्यावर चढण्याआधीच पंकजवर जेलमध्ये जाण्याची वेळ आली. त्यामुळे पालकांनो ‘शुभमंगल’ करताना ‘सावधान’ राहा अस म्हणण्याची वेळ या घटनेमुळे आली आहे. अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे असे ठग सेन  तुमचीही फसवणूक करू शकतात. त्यामुळे लग्न जुळवताना सावधान.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !