बुऱ्हानगर पेयजल योजनेचा नगर सोलापूर रोडच्या कामाने खेळ खंडोबा...
नगर प्रतिनिधी - नगर तालुक्यातील दक्षिण भागातील गावांना बुर्हानगर पेयजल योजना वरदान ठरलेली योजना आहे. परंतु नगर सोलापूर रस्त्याच्या चुकीच्या पद्धतीने खोदकामात दर दोन दिवसाला फुटत आहे.
नगर तालुक्याचे त्या वेळी या भागाचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे होते. त्यांवेळी कार्यकाळात या पाईपलाइन साठी पाठपुरावा मुळे नगर तालुक्यातील दक्षिण गावाला बुर्हानगर पेयजल योजना झाली. या पाईप लाइन कडे जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तसेच नगर तालुक्यातील पुढारी नेते दुर्लक्ष केल्याने वाळुंज, पारगाव, शिराढोण, दहिगाव, साकत खुर्द,वाटेफळ, रुईछत्तीसी, हातवळण, मठपिप्रि,अंबिलवाडी, गुंणवडी, या गावांना पिण्याचे पाणी समस्या भेडसावत आहे. या गावातील नागरिकां पिण्याचे पाणी समस्या भेडसावत आहे. तसेच खाजगी पाणी फिल्टर वर पस्तीस लिटर कॅन तिस रुपयांना पडत आहे.पाणी पट्टी भुर्दड सोसावा लागत आहे.दहिगाव मधील नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहे.यात अतिसार,पोट दुखी, उलटी अशा समस्या जाणवत आहे.
दहिगाव ग्रामपंचायतचे जलशुद्धीकरण केंद्राचे पाणी तपासणी आरोग्य विभागाने करणं गरजेचं आहे.
तरी नगर सोलापूर रस्त्याचे खोदकामाने बुर्हानगर पेयजल योजना पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. नगर सोलापूर रस्त्याचे खोदकाम सुरू असताना या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा