नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरु असल्याने अपघात मालिका सुरूच.
नगर (प्रतिनिधी) - नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या एक वर्षापासून सुरू आहे. चांदणी चौक ते रुईछत्तीसी या दरम्यान रस्ता कामात योग्य नियोजन नसल्याचे पुन्हा पुन्हा समोर येत आहे. शिराढोण गावत एका दिवसातला हा दुसरा अपघात झाला आहे.माल वाहतुक ट्रक क्रमांक के.ऐ ५६-५९८६ असा आहे .
यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. मालवाहतूक ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या ठिकाणी कामाच्या ठिकाणी निर्देश देणारे अधिकारी कर्मचारी अभाव प्रामुख्याने जाणवतं आहे. हे कामं मुख्य ठेकेदार कडुन खालच्या स्तरावर उप ठेकेदार उप ठेकेदार कडुन खालच्या स्तरावर स्थानिक ठेकेदार काम वाटप केले आहे. या मुळे चांदणी चौक ते रुईछत्तीसी या मधील भागात कामा नियोजन नसल्याचे अपघात प्रमाण वाढत चालले आहे. दहिगाव येथील शिंदे नामक नोकरदार आपल्या कार्यालयातुन घरी जात असताना साकत खुर्द येथील उड्डाणपूल जवळुन दुचाकीवरून जात असतानच्या दरम्यान सिमेंटी ब्लॉक हा हाता वर पडला त्या अपघात त्या नागरिकांच्या हाताला मोठ्या प्रमाणावर मुका मार लागला ही घटना लक्षात येताच वरच्या बाजूला जेसीबी चालक दुसऱ्या बाजूनी पळून गेला. सदर व्यक्तीने या उड्डाणपूलाच्या व्हिजीट इंजिनिअर ठेकेदाराला जाब विचारला चुकी मान्य करून माफी मागितल्याने वाद मिटला .
परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षाचे पालन होत नसल्याने पुन्हा पुन्हा समोर येत आहे.त्यांमुंळे जि,एच,व्हि (GHV) कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अहमदनगर सारसनगर कार्यालयाने या विषयी दखल घेऊन या संथ काम व कामाच्या ठिकाणी सुरक्षा पालन करणं आवश्यक आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा