स्नेहबंधतर्फे ऐतिहासिक वास्तुंच्या प्रतिमा भेट देऊन शहराचा वारसा जीवंत ठेवण्याचे काम...


अहमदनगर (प्रतिनिधी) - नगरचा ऐतिहासिक वारसा व मागील ५३४ वर्षांचा इतिहास विविध शासकीय कार्यालये व अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न स्नेहबंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केला आहे. नगरच्या ऐतिहासिक वास्तूंची छायाचित्रे काढून ती शहर स्थापनादिनानिमित्त नगर शहरातील विविध उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भेट देतात. यातून आपल्या शहरास असलेला ऐतिहासिक वारसा वेगळ्या रूपात जीवंत ठेवण्याचे काम डॉ. शिंदे करत आहेत.*

*छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर रसल डिसूजा यांना स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे नगर शहर स्थापनादिनानिमित्त  निजामशाहीतील जलमहाल आणि गार्डन पॅव्हॅलियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक फराहबक्ष महालाची प्रतिमा भेट दिली. यावेळी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे उपस्थित होते. नगर शहर व जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, फराहबक्ष महाल, बेहस्तबाग महल, दमडी मशीद ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. दगडी बांधकामातील जुन्या ऐतिहासिक वास्तू भग्नावस्थेत पोहोचल्या तरी तेथे घडलेल्या ऐतिहासिक घटनांची साक्ष मात्र त्या देतातच. हा ऐतिहासिक वारसा जतन रहावा यासाठी गेल्या पाच वर्षांपासून स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी शहरातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना शहर व परिसरात असलेल्या ऐतिहासिक वास्तुंची प्रतिमा भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.*

*इतिहास नेहमीच प्रेरणादायी मानला जातो. काही जण तो पुस्तकबद्ध करतात, ग्रंथ लिहितात, संशोधन करतात. तर काही कलावंत आपल्या कलेतून तो जगासमोर विलोभनीय  स्वरूपात मांडतात. अशाच प्रयत्न डॉ. उद्धव शिंदे करत आहेत. नगरकरांची ऐतिहासिक वास्तू दर्शनाची ओढ या छायाचित्रांनी जागवल्याचे म्हटले तर वावगे ठरणारे नाही.*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !