गावगाड्याच्या प्रश्नांची सरकारने घेतली दखल.; आश्वासनानंतर सरपंच परिषदेचे आंदोलन मागे.

 


सातारा:- सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आणी रयतक्रांती संघटना यांनी गावगाड्याच्या आणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर सुरू केलेले आंदोलन साताऱ्याच्या वेशीवर आल्यावर  चिघळण्याची शक्यता असतानाच सरकारने   आंदोलनाची दखल घेऊन सहकार मंत्री अतुल सावे मा. विरोधी पक्षनेते प्रवीण जी दरेकर आ. शिवेंद्र राजेभोसले आ. जयकुमार गोरे आ. गोपीचंद पडळकर  आदींनी सरकारचे लेखी पत्र  घेऊन साताऱ्यात आंदोलकांची भेट घेतली यावेळी झालेल्या कार्यक्रमात सरकारचे  दूत म्हणून आलेले अतुल सावे यांनी  सरपंच परिषद मुंबई  महाराष्ट्रआणि रयत क्रांती संघटनेच्या सर्व मागण्या बाबत सरकार सकारात्मक आहे येत्या पंधरा दिवसात यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री  यांच्या सोबत मुंबईत एक बैठक घेतली जाईल आणि या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिल्याने सरपंच परिषदेचे   प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून आपण हे आंदोलन स्थगित करीत असल्याची घोषणा केली कराड मधून निघालेली ही पदयात्रा चार दिवसानंतर साताऱ्यात पोहोचली होती.


साताऱ्यात सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यातील सरपंचांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून परिषदेची ताकद दाखवून दिली  रयत क्रांती संघटनेचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या याप्रसंगी आ. गोरे आ. पडळकर   मा. विरोधी पक्ष नेतेप्रवीणजी दरेकर  मंत्रीअतुल सावे यांनी परिषदेच्या कामाचे कौतुक करत आपल्या  मागण्या या निश्चित मान्य होण्यासारखे आहेत आणि त्या झाल्या पाहिजेत अशी भूमिका घेऊन सरकार आपल्या मागण्या लवकरच मान्य करेल असे लेखी  पत्र सहकार मंत्री अतुल सावे यांनी दत्ताभाऊ काकडे यांच्याकडे  दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी  सरपंच परिषदेचे  कोर कमिटी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे,प्रदेश उपाध्यक्ष   ऍड विकास जाधव   प्रदेश सरचिटणीस राजाराम    पोतनीस राज्य विश्वस्त आनंद जाधव किसनराव जाधव सुधीर पठाडे नारायण वनवे  अरुण भाऊ कापसे, संजय शेलार शत्रुघ्न धनवडे, अर्जुन देवा शेळके, शरद पवार ,समाधान  पोफळे, महेश गाडे ,सरपंच परिषदेचे राज्य प्रसिद्ध प्रमुख संजय बापू जगदाळे जी डी   तेमगिरे,  दयानंद पाटील, चंद्रकांत कन्हेरे,जी एम पाटील, वनिता सुरवसे, सुषमा देसले, अरुणा जाधव, साधना चव्हाण दिपाली चोरगे, रेखाताई घोरपडे, तेजश्री चव्हाण, भीमराव  बोडखे, भरत भवर , बबनराव डोके, सतीश ढवळे ,दत्तात्रय खोटे, पंडित पोकळे, नंदकिशोर   करांडे, ज्ञानेश्वर वाघ ,भरत जाधव, पांडुरंग   तोरगले, बाळासाहेब   पोतनीस, आनंद कळंबे ,नारायण कदम दीपक कुंभार, दिलीप चौगुले , ज्योत्स्ना पाटील,दीपक जाधव, तानाजी पवार, सी ए  पाटील ,दीपक तांबे, संजय खोटे यांच्यासह विविध जिल्ह्यातून आलेले सरपंच आणि सरपंच परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 ---------{आ. निलेश लंके यांच्याकडून आंदोलनाचे कौतुक पारनेरचे आमदार   निलेशजी लंकेे यांनी प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांना फोन करून आपण केलेले आंदोलन हे निश्चित जनतेसाठी आणि गाव गाड्यांसाठी होते आपण केलेले आंदोलन हे निश्चित जनतेसाठी आणि गाव गाड्यांसाठी होते याबद्दल आपले अभिनंदन सदैव आम्ही सरपंच परिषद सोबत राहू आणि परिषदेला सहकार्य करू अशी   ग्वाही दिली.}

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !