अकोळनेरच्या सुपुत्राची UPSC परीक्षेत बाजी. ; महारूद्र जगन्नाथ भोर UPSC सिव्हील सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण !


 नगर ( प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील अकोळनेर गावचे सुपुत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांचे ज्येष्ठ चिरंजीव महारूद्र भोर हे  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सिव्हील सर्व्हिसेस परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल मंगळवार दि.२३ मे रोजी जाहीर झाला असून यामध्ये नगर तालुक्यातील अकोळनेर गावचे रहिवासी व सध्या  भिस्तबाग, अहमदनगर येथे वास्तव्यास असलेले महारुद्र जगन्नाथ भोर हे उत्तीर्ण झाले आहेत. 

महारुद्र भोर यांनी सिंहगड कॉलेज पुणे येथून बी.ई. मेकॅनिकल ची पदवी घेतली आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल, सावेडी अहमदनगर येथे झालेले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण आर.वाय.के. कॉलेज, नाशिक येथून पूर्ण केले आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांचे ते जेष्ठ चिरंजीव आहेत. त्यांच्या निवडीबद्दल द भोर फाउंडेशन अहमदनगर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा व राज्यभरातून कौतुक होत आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !