श्री राम हायस्कूल दहिगाव मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.
नगर प्रतिनिधी:- नगर तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजक संस्थेचे श्री राम हायस्कूल दहिगाव येथे इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी पर्यंत शाळा आहे. मार्च २०२३ एस.एस सी बोर्डचा नुकताच निकाल जाहीर झाला या विद्यालयात देखील मुलींनीच बाजी मारली यांतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थीनी शिंदे प्रियंका रामदास ८७.२०,द्वितीय क्र.कार्ले समीक्षा नितीन ८२.८०,तृतीय क्र.शिंदे साक्षी सतीश ८२.४०,चतुर्थ क्र.सय्यद अलिशा समीर८०.%, पाचव्या क्र.म्हस्के साक्षी शाहू ७८.४०% असे प्रथम पाच विद्यार्थीनीची टक्केवारी आहे. या विद्यालयाचे एकुण ३३ विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले होते त्यातील ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यालयाचा ९८.% निकालाची टक्केवारी आहे. विशेष प्राविण्य श्रेणीतील ९ विद्यार्थी आले आहेत प्रथम श्रेणी १३ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत १० अशी वर्गवारी आहे. या गुणवत्ता विद्यार्थीचा सत्कार सन्मान करण्यात आला.या वेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त करतांना जिल्हा परिषद शाळेतील पदवीधर शिक्षक रिक्त जागा संदर्भात विषय प्रामुख्याने पुढे आला तसेच श्री राम हायस्कूलची नवीन जागेत प्रशस्तं इमारत उभारली जाणार आहे. जिल्हाधिकारीची मान्यता मिळताच कामांना सुरुवात केली जाणार आहे. तसेच दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक मार्गदर्शक व्याख्यान आयोजित करण्याचे ठरले आहे. वर्षातभरात १२ व्याख्यानाची जबाबदारी आन्हाड महाराज व कृष्णा म्हस्के यांनी घेतली आहे. यातुनच विद्यार्थी व पालकांना देखील फायदा होणार आहे. शाळा एक ज्ञान मंदिर आहे.या साठी अनेक आपल्या परीने देणगी देत असल्याने शाळांतील किरकोळ दुरुस्ती खर्च करण्यासाठी मोठी मदत होत आहे.
या वेळी या व्यासपीठाचे अध्यक्ष साकत खुर्दचे मा.उपसरपंच बाबासाहेब चितळकर तसेच दहिगावचे सरपंच सुरेखा म्हस्के, उपसरपंच मनिषा म्हस्के, मा.सरपंच मधुकर म्हस्के, महेश म्हस्के,अशोक आन्हाड, निलफोर सय्यद, भानुदास ढेरे,ह.भ.प भाऊसाहेब आन्हाड,ग्रा.सदस्य गणेश हिंगे, राहुल पोटरे, नामदेव म्हस्के, नवनाथ हंबडेॅ, माणिकराव शिंदे, रामदास चितळकर, नितीन कार्ले, पांडुरंग शिंदे, भिमराज शिंदे, मोहन वाघमोडे, शाहू म्हस्के, चंद्रकांत सावंत, दिपक कालेॅ , रविंद्र वाकचौरे, शिक्षक वर्गातील मदन गांगर्डे, कारभारी गांगर्डे, गोरक्षनाथ काळभोर,नाईक सर आदी मान्यवर उपस्थित होते.
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा