गावठी हातभट्टी अड्डयांवर नगर तालुका पोलीसांची धडक कारवाई !



नगर( प्रतिनिधी):- नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नेप्ती, निमगाव वाघा, खंडाळा गावच्या शिवारामध्ये एकाच दिवशी पाच ठिकाणच्या गावठी हातभट्टयांवर नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख व त्यांच्या पथकाने  धडक कारवाई करत हातभट्टया उदध्वस्त केल्या आहेत. या कारवाईमधे एकुण 6,32,000/- रुपयांचा मुद्देमालाचा जागीच नाश करण्यात आला आहे.      

  याबाबत सविस्तर माहिती अशी की, मा. पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांनी श्री शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर ता. पोस्टे यांना नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध गावठी हातभट्टीवर कारवाई करण्यासाठी सहायक पोलीस अधीक्षक श्री बी. चंद्रकांत रेड्डी साहेब यांना सोबत घेवून नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करावाई करुन गावठी हातभट्टी अड्डे उध्दवस्त करण्याचे आदेश दिले.


त्यानुसार श्री बी.चंद्रकांत रेड्डी, सहायक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिशिरकुमार देशमुख सहायक पोलीस निरीक्षक नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी पोउनि रणजित मराग, पोउनि युवराज चव्हाण, पोहेकॉ/शैलेश सरोदे, पोना/सचिन वणवे, राहूल शिंदे महेश भवर मपोना/गायत्री धनवडे पोकॉ/कमलेश पाथरुट, संभाजी बारोडे, वैभव काळे, अनिल जाधव व चासफौ/ पठाण यांचे अवैध गावठी हातभट्टी धंद्यावर कारवाई करणेकामी पथक तयार केले. 


त्यानुसार सदर पथकाने नेप्ती, निमगाव वाघा, खंडाळा गावच्या शिवारात जावून विविध पाच ठिकाणी गावठी हातभट्टीवर जावून मोठया प्रमाणात कच्चे रसायण, तयार गावठी हातभट्टी व गावठी हातभट्टी तयार करण्यसाठी लागणारे साहित्य असे एकुण 6,32,000/- मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला. याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे सदरबाबत वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री संपतराव भोसल.,  श्री बी.चंद्रकांत रेड्डी सो, सहायक पोलीस अधीक्षक सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोउनि युवराज चव्हाण, पोउनि रणजित मराग, पोना/सचिन वणवे, राहूल शिंदे, महेश भवर, मपोना/गायत्री धनवडे पोकॉ/कमलेश पाथरुट, संभाजी बारोडे, वैभव काळे, अनिल जाधव व चासफौ/ पठाण यांचे पथकाने केलेली आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !