दहिगाव शाळेचा पहिला दिवस आंदोलनाने सुरु. ;प्रशासनाकडून आंदोलनाची दखल.


नगर (प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील दहिगाव साकत येथील प्राथमिक शाळेवर गेली दोन तीन वर्षे संचमानते नुसार पदवीधर शिक्षक नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. या विषयी जिल्हा परिषद अहमदनगर, शिक्षण विभाग,शिक्षण अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा निवेदन तक्रार अर्ज देऊन देखील जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पदवीधर शिक्षका विषयी जाग येत नसल्याने आज दहिगाव ग्रामस्थांच्या वतीने शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेच्या मुख्य गेटला टाळे ठोकले.


या आंदोलनाची दखल घेत  पंचायत समितीचे गटविकास श्रीकांत खरात यांच्या आदेशानुसार  गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नगर बाबुराव जाधव यांनी  दहिगाव शाळेवर अनिल कडुस, सुमन पानसंबळ, वरील दोन पदवीधर शिक्षकांना लेखी आदेशानुसार आठवड्यातील तिनं दिवस कार्यरत राहावे. तसेच साके बाबासाहेब यांची विषयतज्ञ  कायमस्वरूपी ‌नेमणुक केली आहे वरील प्रमाणे या आंदोलनावर मार्ग‌ काढला. 

या ठिकाणी नगर तालुका पोलिस स्टेशनचे पो.हवलदार रमेश गांगर्डे,पो.ना कदम,पो.शि.वडणे वरील पोलिस आंदोलनस्थळी बंदोबस्त कामी तैनात होते.

      या आंदोलना वेळी दहिगावचे माजी सरपंच मधुकर म्हस्के, सोयाटी चेरमन सर्जेराव म्हस्के, व्हाईस चेअरमन दत्तात्रय बनकर,  किसान पाटीॅचे उपाध्यक्ष सुनिल म्हस्के, शिराढोण उपसरपंच दादा दरेकर, महेश म्हस्के, महादेव म्हस्के, भाऊसाहेब आन्हाड,जालिंदर बनकर, संतोष आन्हाड, अनिल म्हस्के,दिपक वाघ,छगन जरे, बाबासाहेब वाघ, संतोष पोटरे, सचिन पोटरे, बाळासाहेब हंबडेॅ, विजय आन्हाड,किरण हिंगे, जावेद शेख,उमेश सावंत,संजय जावळे, शरद निमसे, युवराज पवार, लक्ष्मण कालेॅ, विकास हिंगे, निलेश पोटरे आदी ग्रामस्थ या ओदलनात सहभागी झाले होते.


*बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !