कामक्षा माता पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान. विठ्ठल नामाच्या जयघोषाने कामरगाव परिसर दुमदुमला !



नगर ( हेमंत साठे):- भगव्या पताका हाती घेऊन रथा समोर जय हरी विठ्ठल चा जयघोष करत चालणारे वारकरी... रथासोबत व मागोमाग दूर अंतरापर्यंत विठोबा रुखमाईचे नामस्मरण करत चाललेले वारकरी... आणि सोबत विठ्ठल नामाने भक्तीमय झालेला परिसर हे डोळयाचे पारणे फेडणारे दृश्य म्हणजे विठुरायाच्या भेटीची ओढ असणाऱ्या वारकऱ्यांची दिंडी.
        पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून दिंडी सोहळे पंढरपूर कडे प्रयाण करत आहेत. तसेच नगर तालुक्यातील  कामरगाव मधून देखील सालाबाद प्रमाणे कामक्षा माता दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला.
{कामक्षा माता दिंडी सोहळा काही क्षणांचे व्हिडीओ चित्रण}
          कामरगावचे ग्रामदैवत कामक्षा माता मंदिर परिसरातून कामक्षा माता पायी  दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली .  यावेळी दिंडी सोहळ्याला अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

         कामक्षा माता पायी दिंडी सोहळयामधे कामरगाव ग्रामस्थ तथा पंचक्रोशितील नागरीकांचा मोठया प्रमाणात सहभाग दिसून आला. पुरुष भाविकांसोबत महिला भाविकांचा देखील पायी दिंडी सोहळ्यात लक्षणीय सहभाग होता. वारकऱ्यांसोबतच कामरगाव परिसरातील राजकिय, सामाजिक क्षेत्रातील मंडळीनी देखील कामक्षा माता पायी दिंडी सोहळ्यात विठ्ठल नामाचा गजर करत चालण्याचा आनंद लुटला. कामक्षा माता पायी  दिंडी सोहळ्याच्या आयोजकांनी नियोजन बद्ध व शिस्तबद्ध रित्या दिंडी सोहळयाचे व वारकऱ्यांसाठी सोयीसुविधांचे आयोजन केल्याने पायी दिंडी सोहळा अत्यंत विलोभनीय दिसून येत होता.
          वारकऱ्यांनी केलेल्या विठ्ठल नामाच्या जयघोषाने कामरगाव परिसर दुमदुमला होता तर संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !