कोपरगावची दर्शना पवार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक. खुनाच धक्कादायक कारण समोर.


अहमदनगर:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारची हत्या झाली होती. या प्रकरणातील संशयित राहुल हंडोरेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. 

मागील काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस मुख्य आरोपी राहुल हंडोरे याचा शोध घेत होते. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे पाच पथके त्याचा शोध घेत होती. अखेर मुंबईतून पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतले आहे. या हत्याकांड प्रकरणात आज (ता.२२) दुपारी पत्रकार परिषद घेऊन पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत.

 पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला होता. ती बेपत्ता झाल्याची तक्रार १५ जून रोजी तिच्या पालकांनी नोंदवली होती. त्यानंतर १८ जून रोजी सकाळी तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. 

*लग्नास नकार दिल्याने हत्या*

दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक असून दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती.  त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा. तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे दर्शना आणि तिच्या कुटुंबियांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली. दर्शनाची हत्या केल्याची कबुली राहुलने दिल्याचे समजते.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !