चास गावच्या शिवारातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरी करणारा जेरबंद ! सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीसांची कारवाई !


 नगर(प्रतिनिधी):- तालुक्यातील चास गावच्या शिवारातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरणारा चोरटा ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीसांनी कारवाई केली आहे. 

  याबाबत सविस्तर माहिती अशी की, सौ. मंदा सुर्यभान देवकर रा. चास निमगाव वाघा रोड ता.जि. अहमदनगर यांनी दिनांक 18/10/2022 रोजी फिर्याद दिली की, चास गावच्या शिवारातून निमगाव वाघा रोडवर आमच्या घरासमोर रात्री लावलेला महिंद्र सरपंच 575 DI कंपनीचा ट्रॅक्टर त्याचा नंबर MH 16 CQ 8764 हा   आज्ञात चोरटयांनी चोरुन नेला होता त्याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे ट्रॅक्टर चोरीबाबत आज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर घटनेचे गांर्भीय लक्ष्यात घेवून श्री शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर तालुका यांनी सदर गुन्ह्यासंदर्भात तपास पथक तयार करुन त्यामध्ये पोउनि युवराज चव्हाण, पोहेकॉ/जगदीश जंबे, पोहेकॉ/सुभाष थोरात, पोना/राहुल शिंदे, पोकॉ/कमलेश पाथरुट, पोकॉ/संभाजी बोराडे, पोकॉ/राजू खेडकर यांना तपासाबाबत आदेश देवून सुचना व मार्गदर्शन केले.

सदर पथकांने घटनास्थळाच्या आजूबाजूला चौकशी करुन सिसिटीव्ही फुटेज चेक केले. तसेच आजूबाजूच्या लोकांकडे सदर गुन्हयातील चोरीला गेलेल्या ट्रॅक्टर सदर्भात चौकशी केली. सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना श्री शिशिरकुमार देशमुख साो. यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील चोरी गेलेला ट्रॅक्टर हा इसम नामे सचिन भास्कर जाधव रा. निमगाव वाघा याने चोरलेला आहे व तो सध्या एमआयडीसी येथील चेतना कॉलनी येथे त्याचे अस्तित्व लपवून राहत आहे. त्याअनुशंगाने श्री शिशिरकुमार देशमुख साो. यांनी सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशीत केले की, सदर गुन्हयातील आरोपी हा एमआयडीसी येथील चेतना कॉलनी येथे आहे त्यास जावून ताब्यात घ्या अशा सुचना दिल्याने सदर पथक हे एमआयडीसी येथील चेतना कॉलनी येथे जावून सदर आरोपीचा शोध घेतला असता तो भाडयाने फ्लॅट करुन राहत आसलेबाबत समजले त्यानुसार सदर फ्लॅटमध्ये जावून त्यास ताब्यात घेतले व त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव सचिन भास्कर जाधव वय 29 वर्षे रा. निमगाव वाघा, ता.जि. अहमदनगर असे असलेचे सांगितले. सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदर गुन्हा केलेची त्याने कबुली दिली व ट्रॅक्टर हा मी भाळवणी ता. पारनेर जिल्हा अहमदनगर येथे विकलेला आहे. सदर पथक हे भाळवणी येथे जावून सदर गुन्ह्यातील चोरी गेलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. सदर आरोपी व चोरीला गेलेला ट्रॅक्टर नगर तालुका पोलीस स्टेशन आणून सदर आरोपीला गुन्हयात अटक करुन मा. न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांड रिपोर्टसह हजर करुन त्यास मा. न्यायालयाने दोन दिवस पोलीस कस्टडी मजूंर केली आहे सदर आरोपीकडे त्यांने यापूर्वी अशा प्रकारे गुन्हे केले आहेत काय याबाबत तपास चालू आहे पुढील पोहेकॉ/जगदीश जंबे, नगर ता. पोस्टे हे करीत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला.पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री संपतराव भोसले.सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोउनि युवराज चव्हाण, पोहेकॉ/जगदीश जंबे, पोहेकॉ/सुभाष थोरात, पोना/राहुल शिंदे, पोकॉ/कमलेश पाथरुट, पोकॉ/संभाजी बोराडे, पोकॉ/राजू खेडकर, पोकॉ/सोमनाथ वडणे यांचे पथकाने केलेली आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !