बुऱ्हानगर प्रादेशिक पेयजल योजनेसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले आक्रमक.
नगर (प्रतिनिधी):- नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील वाकोडी फाटा, दरेवाडी,वाळुज-पारगाव,शिराढोण, दहिगाव, साकत खुर्द, वाटेफळ ,रुईछत्तीसी, हातवळण गुंणवडी, अशी नगर तालुक्यातील दक्षिण भागातील गावांना पिण्याचे पाणी बुऱ्हानगर पेयजल योजना अंतर्गत होत आहे.पंरतु गेल्या दिड वर्षा पासून नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग काम चालू आहे.या राष्ट्रीय महामार्ग खोदकामात बुऱ्हानगर प्रादेशिक पेयजल योजनेची पाईपलाइन तुटली जातं आहे. या फुट तुटी मुळे नगरच्या दक्षिण भागातील दहा पंधरा गावाचा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. वरील गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत आहे.एका महिन्यात एकदा नळाला पाणी येते का यांची शास्वती नाही.सदर योजना असल्याने शासन या गावानं टँकर मंजूर देत नाही.
मा.जिल्हा परिषद संदेश कार्ले यांनी आक्रमक होत दिला इशारा. (व्हिडीओ पहा)..👆
या विरोधात आज मा. जिल्हा परिषद सदस्य संदेश कालेॅ यांनी दरेवाडी फाटा वर सहकार्यसह भर उन्हात आंदोलनचा बडगा उगारला मुळे केंद्रिय विद्यालय जवळ सदर पाईपलाइन फुटली त्या ठिकाणी सदर खोदकाम बंद पाडले जबाबदार अधिकारी सदर घटनास्थळी पाहणी करण्यासाठी भुमिका घेतली नगर सोलापूर रस्त्याच्या कामा संदर्भात नेमणूक केलेले संपर्क अधिकारी अमोल बोबडे यांनी या सदर पाईपलाइन दुरुस्ती व पाईपलाइन होई पर्यंत खोदकाम बंद चे लेखी लिहून दिले आहे.आधी पिण्याच्या पाईपलाइन व्यवस्था करणार त्या नंतर रस्ता खोदकाम करणारे आहे.या पुढे जर बुऱ्हानगर पेयजल योजना पाईपलाइन फुटली तर शिवसेना स्टाईलने सदर ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करु असे कालेॅ यांनी ठणकावून सांगितले आहे.
या वेळी ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कालेॅ, दत्तात्रय खांदवे, अमोल उध्दव तोडमल, दरेवाडी ग्रा.सदस्य भाऊ बेरड, अमोल संपतराव तोडमल , ज्ञानेश्वर कोरडे, जि.एच व्ही कंपनीचे संपर्क अधिकारी अमोल बोबडे, दत्ता वाघ, दहिगावचे माजी उपसरपंच महेश म्हस्के,आदी मान्यवर उपस्थित होते.
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा