अल्पवयीन मुलीस पळवून नेणारे आरोपी चोवीस तासात जेरबंद. ; एम.आय.डी.सी. पोलीसांची कामगिरी.

 



नगर:- अल्पवयीन मुलीस पळवून नेणा-या दोन सराईत आरोपीस 24 तासात बीड जिल्हयातुन अटक करून पिडीतेची सुटका एमआयडीसी पोलीसांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 19/06/2023 रोजी फिर्यादी . वय 38 वर्ष धंदा मजुरी रा. पिंपळगाव माळवी ता. जि. अहमदनगर यांनी फिर्याद दिली की, दिनांक 18/06/2023 रोजी रात्री फिर्यादीची पिडीत मुलीला अज्ञात इसमांनी पळवून नेले वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु रजि नं. 531/2023 भादवि कलम 363,366,34 सह बालकांचे लैगिंक अत्याचारापासून सरंक्षण अधिनियम 2012 चे कलम 12, 18 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय बातमी मिळाली.

की, सदर अल्पवयीन मुलीला आरोपी नामे रामेश्वर बाप्पा शिंगोळे रा. पिंपळगाव माळवी ता.जि. अहमदनगर व त्याचा साथीदार अनिल सुभाष गोलवड रा. सावेडी नाका अहमदनगर यांनी पळवून नेले आहे. ते सध्या आष्टी जि बीड येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून आष्टी जि.बीड येथे रवाना केले. त्यावेळी सदर पथकांनी आरोपी नामे 1)रामेश्वर बाप्पा शिंगोळे वय 19 वर्ष रा. पिंपळगाव माळवी ता जि अहमदनगर व त्याचा साथीदार 2 ) अनिल सुभाष गोलवड वय 21 वर्ष रा. सावेडी नाका अहमदनगर यांना पकडुन अल्पवयीन मुलीची 24 तासाचे आत सुटका केली आहे. यातील आरोपी नामे अनिल सुभाष गोलवड हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुद

खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. 1) तोफखाना पोलीस स्टेशन गु रजि नं. 120/2018 भादवि कलम 324,504,506 प्रमाणे

2) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि नंबर 531/2023 भादवि कलम 363,366,34 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन सरंक्षण अधिनियम 2012 चे कलम 12, 18 प्रमाणे सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे सो. अपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर, श्री. संपत भोसले सो उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई चांगदेव हंडाळ, पोसई योगेश चाहेर पोहेकॉ / दत्तात्रय पवार, पोना/ भास्कर मिसाळ, पोकों/ सुरेश सानप, पोकॉ/किशोर जाधव, पोकों/गजानन गायकवाड यांचे पथकाने केली आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !