कत्तलीसाठी जनावरे नेणारा टेम्पो पकडला. ; नगर तालुका पोलीसांची कारवाई !


नगर ( प्रतिनिधी):- गोवंशी जातीच्या जनावराची कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैध वाहतुक करणाऱ्या टेम्पोवर नगर तालुका पोलीस स्टेशनची कारवाई केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री शिशिरकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशन यांना गोपनिय बातमी मिळाली की, सोलापूर ते नगर रोडवर सोलापूरच्या दिशेने एक अशोक लेलंड टॅम्पोमध्ये गोवंशी जातीच्या जनावराची कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने जनावराची वाहतुक करणार आहे. त्यानुसार श्री शिशिरकुमार देशमुख साो. यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री युवराज चव्हाण, पोना/धर्मराज दहिफळे, पोकों / कमलेश पाथरुट, पोकॉ/संदीप जाधव व चासफौ दिनकर घोरपडे यांना तोंडी आदेश दिला की, सदर अवैध गोवंशी जातीच्या जनावराची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतुक करण्याऱ्या टॅम्पोवर वाळुंज बायपास चौक येथे जावून कारवाई करा असा आदेश दिला.

त्यानुसार सदर अधिकारी व अंमलदार हे वाळुंज बायपास येथे जावून सापळा लावून थांबले असता एक सोलापूरच्या दिशेने नगरकडे नमुद बातमीतील आशोक लेलंड टॅम्पो येताना दिसला पोलीस आणि पंचाची खात्री पटताचा चालकाला रोडच्या बाजूला लेलंड टॅम्पो घेण्यास सांगितले त्यांनी लेलंड टॅम्पो रोडच्या बाजूला घेतला असता सदर टॅम्पोची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये गोवंशी जातीचे लहान चार जनावरे दाटीवाटीमध्ये डांबून ठेवलेली दिसली सदर टॅम्पो चालकाला ताब्यात घेवून त्यांस त्याचे नाव व गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव शेख अल्तामाश हुसेन वय २० वर्षे रा. सुभेदार गल्ली, व्यापारी मोहला, झेंडीगेट ता. जि. अहमदनगर असे असलेचे सांगितले. व त्याने कळविले की, सदर गोवंशी जातीचे जनावरे हे मी अहमदनगर येथे कत्तल करण्यासाठी घेवून चाललो आहे. सदर पंचासमक्ष लहान मोठे असे चार जनावरे व एक अशोक लेलंड टॅम्पो अस एकुण २,०४,५००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व त्यातील गोवंशी जातीचे जनावर हे पांजरापोळ, अरणगाव येथे जमा करण्यात आलेला आहे.

सदर घटनेबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री संपतराव भोसले सो., सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोउनि युवराज चव्हाण, पोकों/कमलेश पाथरुट, पोकों/संदीप जाधव, चासफौ दिनकर घोरपडे यांच्या पथकाने केलेली आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !