अकोळनेर शिवारात दिवसा खुनाचा प्रयत्न कलम ३०७ दाखल...कसा झाला वाद वाचा सविस्तर.
नगर तालुका (प्रतिनिधी) - शेतातील रस्त्यावर शेततळे बांधण्याच्या वादातून २ गटात तलवार, लोखंडी रॉड, लाकडी काठ्या यांच्या साहाय्याने जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील ७ जण जखमी झाले असून परस्पर विरोधी फिर्यादींवरुन १३ जणांसह व इतर २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील अकोळनेर गावच्या शिवारात ही घटना घडली.
अकोळनेर गावच्या शिवारात तळे मळा परिसरात असलेल्या शेतातील रस्त्यावर एका गटाने शेततळे करण्याचे काम सुरू केल्याने त्यावरुन हा वाद झाला व त्या वादाचे पर्यावसान जोरदार हाणामारीत झाले. यावेळी तलवारीसह लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांचा वापर करण्यात आला. या तुफान हाणामारीत एका गटातील बाळासाहेब शंकर शेळके, आदेश बाळासाहेब शेळके, निलेश नाथा देशमुख, नाथा मुरलीधर देशमुख हे ४ जण तर दुसर्या गटातील सीताराम उर्फ बाळासाहेब नारायण गारुडकर, शुभम सीताराम गारुडकर, विनायक सीताराम गारुडकर हे ३ असे ७ जण जखमी झाले आहेत.
या संदर्भात नगर तालुका पोलिस ठाण्यात पहिली फिर्याद सीताराम उर्फ बाळासाहेब नारायण गारुडकर (वय ६०, रा.तळेमळा, अकोळनेर, ता.नगर) यांनी दिली असून या फिर्यादीवरुन बाळासाहेब शेळके, नाथा देशमुख, निलेश देशमुख, यशवंत देशमुख, रोहिदस देशमुख, कुंडलिक गारुडकर, विठ्ठल गारुडकर, दादा मोटे (सर्व रा. अकोळनेर) व इतर २० ते २५ जण यांच्याविरुद्ध भा.दं.वि.क. ३२६, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, ४४७, १४९, शस्त्र अधिनियमचे कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरी फिर्याद नाथा मुरलीधर देशमुख (वय ६०, रा.अकोळनेर, ता.नगर) यांनी दिली असून या फिर्यादीवरुन आरोपी सीताराम नारायण गारुडकर, शुभम सीताराम गारुडकर, विनायक सीताराम गारुडकर, शकुंतला नारायण गारुडकर (सर्व रा.अकोळनेर, ता.नगर) यांच्याविरुद्ध भा.दं.वि.क. ३०७, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, शस्त्रअधिनियमचे कलम ४/२५ प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनास्थळी अनेक जण आपल्या आपल्या मोबाईल मध्ये हे फ्री हाणामारी स्टाईलचा व्हिडिओ काढताना या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. या व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकता. नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरील गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा