नगरमध्ये जिजाऊ प्रतिष्ठान मार्फत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा.


नगर(प्रतिनिधी): -

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 349 वा शिवराज्याभिषेकदिन नगर शहरात राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटप करण्यात आले. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता. पेढे वाटपानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शाहिर खराडे यांनी शिवराज्याभिषेकाचा पोवाडा सादर केला. 

यावेळी प्रतिष्ठाणचे सदस्य संजय चव्हाण, राजेंद्र ससे, निलेश म्हसे, पप्पु गिते, दत्ता साठे, सुनिल जरे, महेश बागल, मिलिंद जपे, सचिन जगताप, रवि भुतकर, श्रीपाद दगडे, उदय अनभुले, सतिष इंगळे, बापुराजे भोसले, रामदास वाघ, अशोक कुटे, हारकू मगर, हेमंत मुळे, बबलु ससे, अकोलकर, मिलिंद भालसिंग आदीसह प्रतिष्ठाणचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.

पैठण ते नारायणडोह कावड यात्रा. नारायणडोह यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा.

अकोळनेर हरिनाम सप्ताहात महिलांचे दागिने चोरणारी टोळी पकडली. पोलीसी हिसका दाखवताच १८ जणांच्या टोळीचा पर्दाफाश.