पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार सोहळा दहिगाव येथे संपन्न.
नगर-प्रतिनिधी(शिवा म्हस्के)
महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत प्रत्येक खेडे गांवात दोन महिलांचा सन्मान करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर केला. त्यानुसार पुरस्कार नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार योजना आणली आहे.अहिल्यादेवीं ची २९८ व्याज जयंती निमित्ताने दहिगाव ग्रामपंचायत स्तरावर नेमलेल्या कमिटीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला पुरस्कार शासनाच्या नियम अटी शर्ती नुसार दहिगाव ग्रामपंचायत कमिटी मधील अध्यक्ष सरपंच सुरेखा म्हस्के, सचिव ग्रामसेविका स्वाती घोडके, सदस्य उपस्थित आलेल्या अर्जांची छाननी अंती अंगणवाडी सेविका कमल मोहन जरे, तसेच वंचित विकास सेवा संस्थेच्या सेंटर इन्चार्ज स्वाती शांताराम नेटके यांची समितीने पुरस्कार निवड केली.व तो पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराचे स्वरूप सन्मान पत्र, सन्मान चिन्ह,शाल, श्रीफळ,रोख रक्कम ५०० रूपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.या पुढे महिला बालविकास क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव होत असल्याने या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.
या वेळी सरपंच सुरेखा म्हस्के, उपसरपंच मनिषा म्हस्के, माजी सरपंच मधुकर म्हस्के, ग्रा.सदस्य गणेश हिंगे, महेश म्हस्के, ग्रामविकास अधिकारी स्वाती घोडके, आशा सेविका आशा जाधव, महंमद सय्यद,निलफोर सय्यद, आशा चंदने,नवनाथ हंबडेॅ, शांताराम नेटके,संजय पोटरे, रवी पोटरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
{गेल्या अनेक वर्षांपासून मी महिला साठी काम करत आहे. महिला बचत गट असो, महिला सक्षमीकरण करण्यासाठी शासनाने वेळोवेळी अनेक योजना राबविल्या त्या गाव पातळीवर लागु करण्यासाठी प्रयत्न तसेच धाडसी करण्यासाठी वेळोवेळी अनेक उपक्रम या ठिकाणी राबविले आहे.}
कमल मोहन जरे
(अहिल्यादेवी पुरस्कारकर्ते)
{महिला साठी संगणक प्रशिक्षण वंचित सेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून मी निस्वार्थी सेवा देत आहे. तसेच गावातील मुला मुलींना या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहे संगणक ज्ञान काळाची गरज आहे. हा पुरस्कार मिळाल्याने काम करण्यास मोठी उर्जा मिळाली आहे.}
स्वाती नेटके
(अहिल्यादेवी पुरस्कारकर्ते )
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा