अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर भिंगार कॅम्प पोलीसांची कारवाई !


नगर:- तालुक्यातील भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमधे स्कॉर्पीओ मधून अवैध विदेशी दारूची वाहतूक करणा-यांवर भिंगार कॅम्प पोलीसांनी केली कारवाई आहे. या कारवाई मधे अवैध विदेशी दारूचा एकूण 15,27,080/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

       याबाबत सविस्तर माहिती अशी की,  दिनांक 27/06/2023 रोजी रात्री. कॉबींग ऑपरेशन करीता पो स्टे हद्दीमध्ये रवाना होत असताना सपोनि. दिनकर मुंडे सो यांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, अहमदनगर शहारमधून एक पांढरे रंगाची स्कॉर्पीओ गाडी मधून दारूबंदी गुन्हयाचा माल अवैध पणे काही इसम जामखेड रोडने जाणार आहेत अशी बातमी मिळाल्याने सपोनि. दिनकर मुंडे सो यांनी कॉबींग ऑपरेशन करीता नेमलेल्या अधिकारी व अंमलदार यांना कारवाई करणे कामी रवाना केले.

       अहमदनगर शहरामधील छावनी परीषदेच्या बंद पडलेल्या नाक्यावर नाकाबंदी लावली असता वरील वर्णणाचे वाहन सदर ठिकाणी आलेने वाहन चालकास हात दाखवून सदरचे वाहन उभी केले असता सदर वाहनाचा आर टी ओ नं एम एच 23 बी सी 4045 असा होता. स्कॉर्पीओ ची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये विवीध कंपनीच्या विदेशी दारूचे बॉक्स दिसून आल्याने सदरचे वाहन पोलीस स्टेशनला आणून आरोपी 1) शहादेव मारूती महाडीक वय 42 वर्षे रा. शेरी बुद्रुक, ता. आष्टी जि.बीड 2) नवनाथ दिलीप लोखडे वय 31 वर्षे रा. चांभार गल्ली, कडा ता. आष्टी जि.बीड 3) अक्षय आजीनाथ महाडीक वय 27 वर्षे रा. शेरी बुद्रुक, ता. आष्टी जि.बीड यांचे कब्जामधून विवोध कंपनीच्या विदेशी दारूचे वॉक्स व एक स्कॉर्पीओ वाहन नं एम एच 23 बी सी 4045 असा एकून 15,27,080/- रू चा मुद्देमाल जप्त करून त्यांचे विरूद्ध भिंगार कॅम्प पो स्टे गु र नं 402/2023 महा. दारूबंदी कायदा कलम 65(ई), 80 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.

सदरची कार्यवाही  पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संपत भोसले साहेब, यांचे मार्गदर्शना खाली भिंगार कॅम्प पो. स्टे. चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, सफो/रमेश वराट, पोहेकाँ / रेवननाथ दहीफळे, पोहेकॉ / संदिप घोडके, पोहेकाँ/रेवन्नाथ मिसाळ, पोना / संतोष आडसुळ, पोना/दिपक शिंदे, पोकाँ/अमोल आव्हाड, चापोका /संजय काळे, अशांनी सदरची कारवाई केली आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !