समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांचा आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सत्कार ; राजकारणापेक्षा समाजकारण करणार्‍याला जनता साथ देते -आ. निलेश लंके

 

हमदनगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात सामाजिक योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना भिम पँथरच्या वतीने समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा आमदार निलेश लंके यांनी सत्कार केला. नुकतेच राजर्षी शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर येथे डोंगरे यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले.  

आमदार लंके यांच्या शहरातील संपर्क कार्यालयात झालेल्या सत्काराप्रसंगी संजय गारुडकर, शरद पवार, संदीप शिंदे, आदिनाथ गायकवाड, बंडू गहिले, आमदार लंके यांचे स्विय सहाय्यक शिवा कराळे, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

आमदार निलेश लंके म्हणाले की, सामाजिक कार्याने व्यक्तीची प्रतिमा निर्माण होते. राजकारणापेक्षा समाजकारण करणार्‍याला जनता साथ देते. पै. नाना डोंगरे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, साहित्य, पर्यावरण, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक व क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे कार्य करत आहे. चळवळीतला प्रमाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी कौतुक केले. 

सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, आमदार लंके यांची नेहमीच समाजकार्यासाठी पाठबळ मिळत आहे. गावात राजकारण न करता सर्वसामान्यांसाठी सेवाभावाने कार्य सुरु आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून युवकांना दिशा देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

*बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !