एक वर्षापासुन फरार असणा-या सराईत गुन्हेगारास अटक ; एम.आय.डी.सी पोलीसांची कामगिरी.


नगर( प्रतिनिधी):- दिनांक २९/०८/२०२२ रोजी फिर्यादी नामे विजय बाबुराव जाधव वय ३५ वर्ष धंदा- हॉटेल व्यवासाय रा. बोल्हेगाव ता. जि. अहदमनगर यांनी फिर्याद दिली की आरोपी नामे मनोज साळुंके, रवि सांळुंके संदेश गायकवाड व त्याचा अनोळखी साथीदार यांनी हातात कोयते व लाकडी दांडके घेवुन यातील फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन कोयत्याचा धाक दाखवून परीसरात मोठयाने आरडाओरड करुन दहशत करुन आम्ही आम्ही येथील दादा आहोत आमचे शब्दाचे पुढे गेले तर एकालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवुन त्यावेळी परीसरातील सर्व व्यापारांनी आपआपले दुकानाचे शटर खाली करुन सर्व व्यवहार त्यांचे दहशती पोटी बंद केले वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नंबर ६६७ / २०२२ भादवि कलम ४४७,४५०,३२४, ३२३, सह क्रिमीनल लॉ आमायनमेंन्ट कायदा कलम १९३२ चे कलम ७(१)(अ) आर्म अॅक्ट कलम ४/२५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदर गुनहयातील एक वर्षापासुन फरार असणारा आरोपी संदेश दाविद गायकवाड हा वाळकी येथे आला आहे. त्यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन सदर आरोपीस वाळकी ता.जि. अहमदनगर येथुन शिताफीने अटक करुन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संदेश दाविद गायकवाड वय २५ वर्ष रा.वाळकी ता.जि.अहमदनगर असे सांगीतले सदरचा आरोपी हा सराईत असुन त्यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे.

आरोपी नामे संदेश दाविद गायकवाड वय २५ वर्ष रा. वाळकी ता. जि. अहमदनगर याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

१) नगर तालुका पोस्टे गुरजि.नं. १५९/२०१९ भादवि कलम ३२९ प्रमाणे.

२) एमआयडीसी पोस्टे गुन्हा रजि नंबर ६६७ / २०२२ भादवि कलम ४४७, ४५०, ३२४, ३२३, सह क्रिमीनल लॉ आमायनमेंन्ट कायदा कलम १९३२ चे कलम ७ (१) (अ) आर्म अॅक्ट कलम ४ / २५ प्रमाणे

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे सो. अपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर, श्री. संपत भोसले सो उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई पाठक सो पोकों/किशोर जाधव, पोकॉ/सुरज देशमुख, पोकॉ/ नवनाथ दहिफळे पोकॉ/ सुरेश सानप पोकॉ / जयशिंग शिंदे यांचे पथकाने केली आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !