नगर मधील चेतना कॉलनीतून साडेतीन वर्षाच्या बाळाचे अपहरण व सुटका ! ३ तासात आरोपीला गजाआड करणाऱ्या डॅशिंग सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व एम.आय.डी.सी.पोलीसांच्या कर्तव्य तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक !
नगर ( प्रतिनिधी):- नगर एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीतील चेतना कॉलनी येथे साडे तीन वर्षाच्या बाळाचे अपहरण करण्यात आले.
या घटनेची माहिती एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे डॅशिंग स.पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना समजताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ यंत्रणा कामाला लावत अपहरण करणा-या आरोपीस फक्त ३ तासात गजाआड केले. व चिमुकल्या प्रतिक ला आईकडे सुखरुप सोपवले. मायलेकाची भेट घडवून आणणाऱ्या एम.आय.डी.सी. पोलीस. स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व एम.आय.डी.सी. पोलीसांच्या कर्तव्य तत्परतेचे व कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, नगर मधील चेतना कॉलनी येथे एखादया चित्रपटातील अपहरणाच्या सीन प्रमाणे एका ३ वर्षाच्या चिमुकल्याच्या अपहरणाची गंभीर घटना घडली.
दिनांक १६/०७/२०२३ रोजी दुपारी ०२/१५ वा.चेतना कॉलनी येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी या दुपारी १२/३० वा चे सुमारास भाडोत्री खोली बघण्याकरीता गेले असता त्यांचे सोबत साडेतीन वर्षांचा मुलगा प्रतिक हा होता फिर्यादी चेतना कॉलनी येथे भाडोत्री रुम पाहत असताना त्यांचा मुलगा हा रस्त्यावर उभा होता फिर्यादी रुम पाहुन खाली आल्यावर त्यांना त्यांचा मुलगा हा रस्त्यावर दिसला नाही. त्यांनी आजु बाजुला पाहीले त्यांना मुलगा प्रतिक कोठेच मिळुन आला नाही त्यांनी आजु बाजुला विचारले की येथे लहान मुलगा पाहीला का तेंव्हा तेथील लोकांनी त्यांना सांगीतले की आत्ताच थोडया वेळापूर्वी एक ३०-३२ वर्षाच्या एका इसम त्याला त्याचे बरोबर घेवुन गेला तेंव्हा फिर्यादी यांची खात्री झाली की माझ्या मुलास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे त्यांनी लगेच डायल ११२ यावर फोन करुन मुलगा प्रतिक यास एक अनोळखी इसमाने माझे संमत्ती शिवाय घेवुन गेला आहे असे सांगीतल्यावर सदर घटनेचा फोन कंट्रोल वरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्राप्त होताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी .सपोनि सानप यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन ताबडतोब घटना ठिकाणी जावून भेट दिली त्यांनी, तात्काळ एक पथक तयार करुन पथकातील कर्मचारी यांनी सदर घटने बाबत तात्काळ माहिती घेतली असता त्यांना मेहकरी गावचे बस स्टॅन्ड परीसरात एक इसम एका लहान मुलासह संशयीत रीत्या फिरत असल्याचे माहिती मिळाली. सदर ठिकाणी तात्काळ पोहचुन मेहकरी गावचे बस स्टॅण्ड परीसरात शोध घेतला असता जेथे एक इसम हा त्याचे सोबत असलेला मुलगा पथकातील कर्मचारी यांना दिसला. लगेच फिर्यादी यांना तो दाखवला असता फिर्यादीने ओळखले कि हा त्यांचाच मुलगा प्रतिक आहे त्यावेळी त्याला घेवुन फिरणाऱ्या संशयीत इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव देवेंद्र बबन थोरात रा. शेवगाव असे असल्याचे सांगीतले त्यास मुलाबाबत अधिक विचारपुस केली असता त्यानी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यास ताब्यात घेवून एमआयडीसी पोलीस स्टेशनला आनल्यावर फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु. रजि. नंबर ६२३ / २०२३ भादवी कलम ३६३ प्रमाणे दि. १६/०७/२०२३ रोजी दाखल करण्यात आलेला आहे. व आरोपीस सदर गुन्हात अटक करण्यात आली असुन त्यास न्यायालयीन कोठडी मिळाली आहे..
फक्त ३ तासात अपहरण झालेल्या चिमुकल्या प्रतिक ची सुटका करत. मायलेकाची भेट घालून देणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व एम.आय.डी.सी. पोलीसांच्या कामगीरीचे व कर्तव्य तत्परतेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
सदरची कामगिरी श्री. राकेश ओला. पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे . अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री. संपत भोसले . उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. राजेंद्र सानप,. पोसई गायकवाड सो, पोहेकॉ/ १७७५/सांगळे, पोना/१९४८ मिसाळ,पोकॉ/ २३८४ सानप, पोकों / २६३२ देशमुख, पोकॉ/७४३ शिंदे, मपोकॉ १७०८ पठाडे व अहमदनगर दक्षिण विभागाचे मोबाईल सेलचे पोकॉ/२५५६ राहुल गुंड व पोशि / २४३५ नितीन शिंदे, यांचे पथकाने केलेली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा