वाळकी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा अखेर सापडला ! पीडीत मुलीसह आरोपी नगर तालुका पोलीसांच्या ताब्यात.

 

नगर ( प्रतिनिधी) :- नगर तालुक्यातील वाळकी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन मागील एक वर्षापासून फरार असणारा आरोपी पिडीत मुलीसह नगर तालुका पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.

  याबाबत सविस्तर माहििती अशी की, वाळकी येथील पिडीत महिला हिनी दिनांक 19/9/2022 रोजी फिर्याद दिली की, माझी मुलगी सकाळी कॉलेजमध्ये गेली परंतु ती घरी आली नाही म्हणुन आंम्ही तिच्या कॉलेज मध्ये जावून चौकशी केली असता तिच्या मॅडमने आंम्हास कळविले की, पिडीत मुलीने मला सांगितले की, माझ्या पोटामध्ये दुखत आहे व माझ्या वडीलांना फोन करायचा आहे,  म्हणून मी तिला माझा फोन दिला तिने कोणालातरी फोन केला व मला म्हणाली की मी घरी चालले म्हणून कॉलेजमधून निघून गेली आहे. परंतु ती घरी आलेली नाही तिचे कोणीतरी आज्ञात इसमानी तिचे अपहरण केलेले आहे अशा मजकुराची फिर्याद नगर ता. पोस्टे येथे देण्यात आलेली होती.

सदर घटनेचे गांर्भीय लक्ष्यात तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक यांना सदर गुन्ह्यासंदर्भात तपास करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या त्यानुसार पोलीस अधिकारी व अंमलदार याचे पथक काढुन आरोपीचा शोध घेण्याकामी मुंबई, पनवेल, कोल्हापूर, वसई-विरार येथे जावून तपास केला होता परंतु आरोपी व पिडीत अल्पवयीन मुलगी मिळून येत नव्हती सदर पिडीत मुलीचे आई वडील हे वारंवार तात्कालीन वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना भेटून मुलीचा शोध घेणेकामी विनंती करीत होते परंतु आरोपी हा शातीर असल्याने त्याचा मागोवा लागत नव्हता.

त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला. यांना सदर पिडीत मुलीचे आई, वडील व तिचे नातेवाईक भेटून विनंती केली की माझी मुलगी मागील एक वर्षापासून फरार आहे व तिचा तपास होण्याची विनंती केली, त्यानुसार मा. पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला. यांनी श्री शिशिरकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशन यांना सदर गुन्ह्याचा योग्य तपास करण्याच्या सुचना दिल्या व पिडीत मुलगी व आरोपी यांचा शोध घेण्याची सुचना व मार्गदर्शन केले.

त्यानुसार श्री शिशिरकुमार देशमुख सो यांनी पोउनि युवराज चव्हाण, पोउनि रणजित मराग, पोहेकॉ/सुभाष थोरात, पोकॉ/कमलेश पाथरुट, राजु खेडकर, संभाजी बोराडे, विक्रांत भालसींग यांचे पथक तयार करुन सदर गुन्ह्याबाबत योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार सदर पथकातील अधिकारी व अंमलदार याने आरोपीचा शोध घेणेकामी बदलापूर, पनवेल, मुंबई येथे जावून चौकशी केली त्यादरम्यान पथकाला माहिती भेटली की आरोपी हा सोशल मिडीयाचा वापर करीत त्यानुसार सदर पथकाने सायबर पोलीस स्टेशनचे पोउनि सचिन रणशेवरे व पोकॉ/राहूल गुंडू यांचे मदत घेवून त्याचे तांत्रीक विश्लेषन करुन आरोपी हा काठापूर बुद्रुक ता. आंबेगाव जिल्हा पुणे येथे वास्तव करीत आहे अशी माहिती भेटली त्यानुसार सदर पथक हे तात्काळ काठापूर बुद्रुक ता. आंबेगाव जिल्हा पुणे येथे जावून सदर आरोपीचा व पिडीत मुलीचा शोध घेतला असता सदर आरोपी व पिडीत मुलगी त्यांचे नाव बदलून एका शेतामध्ये कामगार म्हणून राहत आहे अशी बातमी मिळाली त्यानुसार सदर पथक हे त्या शेतातजावून पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी नामे सुहास घनश्याम बोठे वय 22 वर्षे रा. वाळकी ता.जि. अहमदनगर यास ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी व पिडीत मुलगी हिस पोलीस स्टेशन येथे घेवून येवून पिडीत मुलगी हिस बालकल्याण समिती, अहमदनगर यांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे व आरोपी नामे सुहास घनश्याम बोठे वय 22 वर्षे रा. वाळकी ता.जि. अहमदनगर यास मा. न्यायालयात पोलीस कस्टडी रिपोर्टसह हजर करण्यात आले तेव्हा मा. न्यायालयाने आरोपीला 5 दिपस पोलीस कस्टडी दिलेली आहे. पुढील तपास पोउनि युवराज चव्हाण हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री संपतराव भोसले., सपोनि शिशिरकुमार देशमुख., पोउनि युवराज चव्हाण, पोउनि रणजित मराग,  पोउनि सचिन रणशेवरे,  सायबर पोस्टे, पोहेकॉ/सुभाष थोरात, पोकॉ/कमलेश पाथरुट,  पोकॉ/राहूल गुंडू, सायबर पोस्टे पोकॉ/राजु खेडकर, पोकॉ/नितीन शिंदे, पोकॉ/संभाजी बोराडे, पोकॉ/विक्रांत भालसींग यांचे पथकाने केलेली आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.

पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.