रोड रॉबरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ! सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी.पोलीसांची धडक कारवाई !
नगर( प्रतिनिधी):- एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीत रोड रॉबरी करुन ०३ म्हशीसह पिकअप पळविणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीतील एका सराईत आरोपीस बीड येथून अटक करून त्याच्याकडून ५,१०,०००/- रुपयांचा मुददेमाल हस्तगत केला आहे. सदर कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय. डी. सी. पोलीसांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एम.आय.डी.सी पोलीस ठाणे, अ.नगर येथे दिनांक-१७/०६/२०२२ रोजी फिर्यादी नामे दिनेश महादेव मोरे, वय-२३ वर्षे, धंद ड्रायव्हर, मु.पो. राहु, ता. दौंड, जि.पुणे यांनी फिर्याद दिली होती की, फिर्यादी हे दौड येथुन घोडेगाव जनावरांचे बाजारात एकुण च म्हशी या पिकअपमध्ये भरुन विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांना त्याच दिवशी रात्री - ०२/०० वाजण्याच्या सुमारास न औरंगाबाद रोड जेऊर गावचे शिवारात, हॉटेल शिव जवळ, ता. जि. अ.नगर. येथे एकुण ३ आरोपीत यांनी फिर्यादीच्या पिकअप मार मोटार सायकलवर येवून त्यांचे ताब्यातील मोटार सायकल फिर्यादीचे पिकअपला आडवी लावून त्यांना धारदार हत्याराचा धा दाखवून शिवीगाळ करुन फिर्यादीजवळ असलेले पिकअप, एकुण ०३ म्हशी ही जनावरे, तीन मोबाईल हॅण्डसेट, रोख रक्कम रुप २,०००/- असा मुददेमाल चोरुन नेलेला होता. त्यापकी यापुर्वीच म्हशी चोरणारे दोन व म्हशी विकत घेणारा एक असे एकुण ती आरोपी यापुर्वी अटक करण्यात आलेले असुन त्यांचा एक साथीदार मुख्य आरोपी नामे-समाधान बाबुराव खिंडकर, र बेलवाडी, ता. जि. बीड हा सराईत आरोपी असुन तो आजपावेतो फरार होता.
सदर गुन्हयाचा तपास करत असताना सदर गुन्हयातील फरार आरोपीत याचा शोध घेतला असता तो बीड शहर परिसरात असल्याबाबत गोपनीय बातमी मिळाल्याने त्यास अटक करण्यासाठी प्रभारी अधिकारी सपोनि / राजेंद्र सानप सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी/सी.बी. हंडाळ, पोशि/ २३७६ गजानन गायकवाड, पोशि/ १२९० किशोर जाधव, होमगार्ड / गणेश सुरेश वाघ यांचे तपास पथक रवाना करण्यात आलेले होते. त्यावेळी पोलीस पथकाने पिंपळनेर बीड येथे जावुन आरोपीत याची गोपनीय माहीती काढुन त्यास ताब्यात घेवून त्यास अटक केलेली असुन त्याचेकडुन पिकअपसह ३ म्हशी असा ५,१०,००० /- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरोधात अ.नगर, बीड, पुणे येथे खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) बीड शहर पोलीस स्टेशन गु.र.नं ११३ / २०१६ भादंविसं- ३९४,४५०,३४.
२) बीड शहर पोलीस ठाणे गु.र.नं-०९/२०१६ भादंविसं-३४१, ३९५,४१२, ४१४, १७६. ३) पेठ बीड पोलीस ठाणे गु.र.नं- ३० / २०१५ भादंविसं-३९५.
४) पेठ बीड पोलीस ठाणे गु.र.नं- ९१/२०१७ भादंविसं- ३९९, ४०२. ५) शिराळा पोलीस ठाणे गु.र.नं-११२ / २०१९ भादंविसं-३९२,३४.
६) बीड शहर पोलीस ठाणे गु.र.नं-२०/२०१५ भादंविसं-३९२, ३४.
७) पिंपळनेर पोलीस ठाणे गु.र.नं-२८/२०११ भादंविसं- ३४४, ३२४, ३२३, १४७, १४८. ८) शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.र.नं-७४/२०१४ भादंविसं -४५७,३८० ९) पिंपळनेर पोलीस ठाणे गु.र.नं १४९/२०१४ भादंविस- ३२४, ३४१, १४७, १४८, १४९,३५३,३३२, ३३३,३३७.
१०) पिंपळनेर पोलीस ठाणे गु.र.नं-२० / २०१२ भादंविसं- ३२४, ३२३, ५०४, ५०६. ११) खेड पोलीस ठाणे, पुणे गु.र.नं- ०१/२०१७ भादंविसं-३९३,३९४, आर्म अॅक्ट-३/२५.
१२) MIDC पोलीस ठाणे अ.नगर गु.र.नं-४२५ / २०२२ भादंवि ३९४, ४११,५०४, ५०६, ३४. प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही श्री. राकेश ओला . पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे . अपर पोलीस अधीक्ष अहमदनगर श्री. संपतराव भोसले . उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपो श्री. राजेंद्र सानप. प्रभारी अधिकारी एमआयडीसी पो.स्टे, पोउपनिरी/चांगदेव हंडाळ, पोकों/ २३७६ गजानन गायकवाड, पोशि/ १२३ किशोर जाधव, पोशि/ भगवान वंजारी, पोशि/ज्ञानेश्वर तांदळे, पोशि/ सुरज देशमुख, होमगार्ड/ गणेश सुरेश वाघ, मोबाईल सेल मपोशि/रिंकु माढेकर, पोकों/नितीन शिंदे यांचे पथकाने केलेली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा