पारनेर तालुक्यातील या दूध भेसळ केंद्रावर अन्न आौषध प्रशासनाचा छापा; २२०० लीटर दूध जप्त.
नगर ( प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील दूध भेसळ करणाऱ्यांविराेधात प्रशासनाने कारवाई केली आहे. दूध भेसळ करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील अधिकृत दूध संकलनाचा परवाना नसलेल्या जय हनुमान दूध संकलन केंद्रावर अन्न -औषध प्रशासनाने छापा टाकून गुणवत्ता तसेच भेसळीच्या संशयावरून सदर दूध संकलन केंद्रातून २२०० लीटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट केले.
नगर जिल्हा प्रशासनाने दुधात हाेणाऱ्या भेसळीला लगाम लावण्यासाठी नुकतीच जिल्हास्तरावर समिती स्थापन केली असून. भेसळयुक्त दुधाबाबत तपासणी मोहीम, यात सहभागी असणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करणे, भेसळयुक्त दूध किंवा पदार्थ स्वीकारणाऱ्यांनाही या प्रकरणात सह आरोपी करावे, असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिले हाेते. त्यानुसार अन्न-औषध प्रशासनाच्या पथकाने नुकतेच पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील परवाना नसलेल्या जय हनुमान दूध संकलन केंद्रावर छापा टाकून संशयास्पद २२०० लीटर दूध जप्त करण्याची कारवाई करून नष्ट केले आहे.
अन्न औषध प्रशासनाने कारवाई केलेले हे केंद्र भास्कर मारुती करंजुले यांच्या मालकीचे हे दूध संकलन केंद्र असून, त्यांच्याकडे दूध संकलनाचा परवाना नसल्याचे आढळून आले. जप्त केलेल्या दुधाचा पथकाने पंचनामा केला आहे. या दुधाची किंमत ७७ हजार रुपये इतकी असल्याचे समजते. तालुक्यासह जिल्ह्यातील भेसळखोरांवर कडक कारवाई करत जरब बसवण्याचे काम अन्न औषध प्रशासनाने करावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा