सुपा गावाची पाण्याची तहान भागवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे यांचे पालकमंत्र्यांना साकडे !

पारनेर ( हेमंत साठे):- सुपा गावानजीक असणारी सुपा औदयोगिक वसाहत , तसेच जापनीज पार्क मुळे येणाऱ्या नवनवीन उदयोग धंदयांसोबतच त्यासाठी लागणाऱ्या कामगार वर्गामुळे सुपा गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु त्यासाठी लागणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे सुपा गावच्या सरपंच मनिषाताई रोकडे यांचे पती तथा सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे यांनी सुपा गावाची पाण्याची तहान भागवण्यासाठी थेट नगर  जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना साकडे घातले.

          मिळालेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना, पारनेर तहसिल कार्यालय येथे सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे यांनी सुपा गावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विनंती केली की, सुपा गावाला MGP अंर्तगत विसापूर तलावातून पाणी योजनेसाठी अंदाजे साडे चौदा कोटी मंजूर झाले. परंतु योजनेचे काम पूर्ण न झाल्याने सुप्याला पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यानंतर नगर जिल्हयाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून व प्रशासनाच्या माध्यमातून एक लाख लिटर टॅंकरने पाणी पुरवठा सुप्यासाठी दिला. परंतु सुपा गावची लोकसंख्या गणना सन 2011 साली अंदाजे 6 हजार होती.  प्रशासकीय रेकॉर्ड नुसार आजही तीच ग्रहीत धरली जाते. परंतु आज सुपा गावाची लोकसंख्या अंदाजे 30 हजार ते 40 हजार आहे. त्यामुळे होणारा पाणीपुरवठा कमी आहे. तरी आपण स्वतः लक्ष घालून सुपा गावाच्या सदयस्थितीतील लोकसंख्येनुसार कायमस्वरूपी पाणीपुरवठा समस्या सोडवावी. व सुपा गावची पाण्याची तहान भागवावी. अशी विनंती मोठया तळमळीने सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केली.

         या बैठकीवेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाटील शिंदे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष अश्विनीताई थोरात, पारनेर भाजप जिल्हाध्यक्ष सुनिल थोरात, उपसरपंच दत्ता नाना पवार, ग्रामपंचायत सदस्य, इतर सहकारी व नागरीकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


{ दिवसेंदिवस वाढती सुपा औद्योगिक वसाहत व त्यामुळे सुपा गावात वाढणारी लोकसंख्या यामुळे सुपा गावाची पाणी पुरवठ्याची समस्या कायमस्वरूपीसाठी सोडवावी. असे साकडे मी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री. राधाकृष्ण विखे पाटील यांना घातले आहे.

-सामाजिक कार्यकर्ते:- योगेश रोकडे.}


*बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !