नेप्तीला होणाऱ्या दुसरे काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माधवराव लामखडे यांची नियुक्ती.
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले दुसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा उद्योजक माधवराव लामखडे यांची नियुक्ती करण्यात आली.
काव्य संमेलनाचे संयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी लामखडे यांच्या स्वागताध्यक्षपदाची नियुक्ती जाहीर करुन त्यांचा सत्कार केला. नवोदित कवी व नामवंत कवींचे काव्य संमेलन शिक्षक दिनानिमित्त दि.3 सप्टेंबर रोजी नगर-कल्याण रोड, बायपास चौक (नेप्ती) येथील अमरज्योत लॉन मध्ये रंगणार आहे. सातत्याने कला, क्रीडा, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील कार्यक्रमास नेहमीच लामखडे यांचे सहकार्य लाभत आहे. या काव्य संमेलनाच्या माध्यमातून नवोदित कवींना प्रोत्साहन मिळणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुरस्कार दिला जाणार आहे. तर कवींचा देखील सन्मान होणार आहे. काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लामखडे यांचे ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी सुभाष सोनवणे, उद्योजक राजेंद्र उदागे, शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या शर्मिला गोसावी, ज्ञानदेव पांडुळे, कवी रज्जाक शेख, आनंदा साळवे, विक्रम अवचिते, गिताराम नरवडे, कवियत्री जयश्री सोनवणे, मुख्यध्यापिका अनिता काळे आदींनी अभिनंदन केले.
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा