नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा रात्री फोन खणाणतो अन् त्या आजीला तात्काळ मदत मिळते !


नगर ( हेमंत साठे):- नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे व कार्यतत्परतेमुळे नगर शहरातील 93 वर्षीय गरजू एकल महिलेला शासनाच्या योजनेचा तात्काळ लाभ मिळाला आहे.

          समाजात अनेक गरजू व्यक्ती, एकल महिला, विधवा, अपंग, निराधार आहेत. या सर्वांना शासनाच्या योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवन सुकर होईल त्याचवेळी महसूल सप्ताह खऱ्या अर्थाने साजरा होईल, असे मत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगर शहरातील एकल महिलेला मदत मिळवून देताना व्यक्त केले.

  दि. २ ऑगस्ट,२०२३, वेळ रात्री ११-०० वाजताची. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा मोबाईल खणाणतो आणि सावेडी परिसरातील आनंदनगर भागात ९३ वर्षाच्या छबुबाई चित्रा कदम या एकल महिला राहत असून त्यांना प्रशासनाकडून मदतीची गरज असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी वेळ न पाहता अन्नधान्य वितरण अधिकारी अर्चना पगारे व  संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार विशाल नाईकवाडी यांना फोन करून महिलेला तातडीने मदत करण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेची अंमलबजावणी करत एकल महिलेशी दोनही अधिकाऱ्यांनी संपर्क साधून महिलेस पिवळी शिधापत्रिका मंजूर करत धान्य देण्याची व्यवस्था केली तर श्रावणबाळ वृद्धपकाळ योजनेतून दरमहा १ हजार ५०० रुपयांचे वेतन मंजूर करण्यात आले.

  समाजाप्रती आपलेही काही देणे लागते ही भावना मनी वृद्धिंगत करून  सर्वसामान्यांची सेवा करण्याची संधी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळते. या संधीचे सोने करत प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

📲 *बातमी साठी संपर्क:- 7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !