सुपा गावचे सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे यांनी पालकमंत्र्यासमोर मांडली नागरीकांच्या रेशन कार्ड समस्येची कैफियत !
पारनेर ( हेमंत साठे) :- सुपा गावचे सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे यांनी काल दि 8 ऑगष्ट रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रमाअंतर्गत नगरचे पालकमंत्री पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पारनेर तहसिल कार्यालया मधे झालेल्या मिटींग मधे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर सुपा गावच्या ग्रामस्थांच्या रेशन कार्ड बददल समस्याची मोठ्या तळमळीने कैफियत मांडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर तहसिल कार्यालय येथे शासन आपल्या दारी अंतर्गत पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जि .प अहमदनगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर , पारनेर तालुक्याचे प्रांत, पारनेर तालुक्याच्या तहसीलदार गायत्री सैंदाणे यांच्यासमोर सुपा गावातील 155 कुटुंबाचा रेशन कार्डचा 16-17 महिन्याचा रखडलेल्या प्रश्ना बद्दल तळमळीने कैफियत मांडली. यावेळी योगेश रोकडे यांनी टॅक्स भरणारे अपात्र रेशन कार्ड धारकांची नावे कमी करुन गरीब ज्यांना खरच गरज आहे. अशा खरोखर पात्र असणाऱ्या गरीब नागरीकांना रेशन कार्ड मिळावे. अशी मागणी मोठया तळमळीने केली. या बैठकीवेळी सुपा गावचे सामाजिक कार्यकर्ते योगेश भाऊ रोकडे,राहुल पाटील शिंदे, भाजप महिला जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई थोरात, पारनेर भाजप अध्यक्ष सुनील थोरात ,उपसरपंच दत्तानाना पवार, ग्रामपंचायत सदस्य व इतर सहकारी व नागरीकांची उपस्थिती होती.
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा