काव्य संमेलनाध्यक्षपदी प्रा. डॉ. शंकरराव चव्हाण यांची नियुक्ती.


अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित दुसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाध्यक्षपदी प्रा. डॉ. शंकरराव चव्हाण यांची निवड करण्यात आली. 

डॉ. चव्हाण यांची काव्य संमेलनाध्यक्षपदी नियुक्ती करुन काव्य संमेलनाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा कवी सुभाष सोनवणे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सुरेश खामकर, जमीर पठाण आदी उपस्थित होते.

नवोदित कवी व नामवंत कवींचे काव्य संमेलन नगर-कल्याण रोड, बायपास चौक (नेप्ती) येथील अमरज्योत लॉन मध्ये शिक्षक दिनानिमित्त दि.3 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. या काव्य संमेलनाध्यक्षपदी नियुक्ती झालेले डॉ. चव्हाण हे पाथर्डी तालुक्यातील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आहे. शब्दगंध साहित्यिक परिषदेचे माजी अध्यक्ष पद त्यांनी भूषवले असून, प्रिये काव्य संग्रह व कोंडमारा काव्य संग्रह प्रकाशित झाले आहे. दमन कोंडमारा याची हिंदी आवृत्ती देखील प्रकाशित झाली आहे. मशाल एकांकिका संग्रह देखील त्यांचा प्रसिध्द आहे. सर्व ग्रंथ पुणे विद्यापिठ एफ.वाय. बीए ते एम.ए. या वर्गाच्या राज्यशास्त्र अभ्यास क्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून समाविष्ट झालेले आहे.

काव्य संमेलनाच्या निवड समितीने एकमताने त्यांची संमेलनाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनिल गोसावी, कवी आनंदा साळवे, रज्जाक शेख, प्राचार्या गुंफाताई कोकाटे, ज्ञानदेव पांडुळे, गिताराम नरवडे, जयश्री सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे. 


📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !