वृक्षांमुळे मानवी जीवन प्रभावित : पोलीस अधीक्षक राकेश ओला. ;पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात स्नेहबंधतर्फे वृक्षारोपण !

नगर- ( हेमंत साठे) - “वृक्षवल्ली आम्हा सोयरी” म्हणजे झाड आपले मित्र. हो खरच, वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे. वृक्ष केवळ आपलेच जीवन प्रभावित करतात असे नव्हे, ते तर आपले अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले.

स्नेहबंध सोशल फाउंडेशन च्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, राखीव दलाचे पोलीस निरीक्षक अनुजकुमार मडामे, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पो.हे.कॉ. अन्वर अली सय्यद, हेमंत ढाकेफळकर उपस्थित होते.

स्नेहबंध फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी विविध शासकीय कार्यालये, शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावला.

वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्याचे आवाहन...

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. वृक्षांचा होत असलेला मृत्यू हा पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा हळूवारपणे होत असलेला अंत आहे. हे ध्यानात घेऊन मानवाने वृक्षाची लागवड व संवर्धन करावे, असे आवाहन स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.

📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !