वाळकी गावात पत्रकारांच्या हस्ते ध्वजारोहण !

          नगर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वाळकी गावातील न्यु इंग्लिश स्कूल व कला विज्ञान महाविद्यालयात ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला . वाळकी येथील महाविद्यालयात प्रथमच पत्रकारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .

           महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन , प्रजासत्ताक दिनी विविध क्षेत्रात नावलौकिक असणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकावण्याची परंपरा जतन केली आहे . स्वातंत्र्य दिनी  दैनिक पुढारीचे पत्रकार ज्ञानदेव गोरे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी पत्रकारांना ध्वजारोहण करण्याचा मान प्रथमच देण्यात आला आहे.

            या कार्यक्रमा प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कॉन्सिल सदस्य बाळासाहेब बोठे ,  स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रताप बोठे , सेवानिवृत्त जिल्हाधिकारी तुकाराम कासार , प्राचार्य बाळासाहेब साळुंके , जॉनडियर कंपनीचे मॅनेजर महेश साठे , जेष्ठ शिक्षक एकनाथ कासार , सुनिल कोठुळे , प्रा . अरुण कदम आदींसह विद्यार्थी ,शिक्षकवर्ग , माजी शिक्षक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

         वाळकीतील सेवा संस्था , ग्रामपंचायत , पाथमिक शाळा , पोलीस दुरक्षेत्र , वाडी वस्त्यावरील जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वातंत्र्य दिनी उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले . ग्रामपंचायतच्या वतीने यावेळी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला . सरपंच शरद बोठे यांच्या हस्ते माजी सैनिकांना शाला , सन्मान पत्र देत त्यांच्या देशसेवेचा स्वातंत्र्य दिनी गौरव करण्यात आला . यावेळी सेवा संस्थेचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , ग्रामपंचायतचे सरपंच , ग्रामसेवक , सदस्य ,  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !