पत्रकार हेमंत साठे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित !
नगर (प्रतिनिधी):- पत्रकारिता तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच निर्भिड व वस्तुनिष्ठ पत्रकारिते साठी पत्रकार व शैक्षणिक सल्लागार हेमंत साठे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर जिल्हयातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा व स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशिय संस्थेकडून आयोजित सामाजिक , शैक्षणिक, पत्रकारिता शेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान तसेच गुणगौरव करण्यासाठी हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा रविवार दि. ३ सप्टेंबर 23 रोजी नगर शहरातील अमर ज्योत लॉन्स येथे पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात पत्रकारिता तसेच सामाजिक व शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळयाचे प्रमुख अतिथी नगर पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार.निलेश लंके हे होते. तर स्वागताध्यक्ष मा. जिल्हा परिषद सदस्य तथा उद्योजक माधवराव लामखडे हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शद्बगंध साहित्य परिषदेचे राजेंद्र उदागे हे होते. तर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्या साठी सन्मानिय अतिथी म्हणून तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे तसेच कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे , तसेच उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक गोपाल चांदेकर , उदयोजक राजेंद्र शिंदे, उदयोजक बाळासाहेब शहाणे , क्रीडा प्रशिक्षक सुरेश जाधव, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
पत्रकार हेमंत साठे यांना वस्तुनिष्ठ व निर्भिड पत्रकारिते करिता तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याकरिता उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले.
तसेच या पुरस्कार सोहळयात शैक्षणिक, सामाजिक, साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळयाचे प्रमुख अतिथी आमदार निलेश लंके यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळयाचे प्रमुख आयोजक तथा सामाजिक , शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य करणारे पै. नाना डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशिय संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा