शेतकऱ्याला लिफ्ट मागून छेडछाडीची धमकी देत , ब्लॅकमेलींग करून खंडणी उकळणारी महिला जेरबंद ! सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीसांची कारवाई !
नगर( प्रतिनिधी):- पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्याला महिलेने लिफ्ट मागीतली व कौडगाव येथे खंडणी मागून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या महिलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिसांनी केले जेरबंद !
याबाबत सविस्तर माहिती अशी की , कौडगाव ते जाम फाटा अनोळखी महिलेने पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्याला लिफ्ट मागितली संबंधित शेतकऱ्यांनी त्या महिलेला कौडगाव येथून जाम फाट्यापर्यंत लिफ्ट दिली.
लिफ्ट दिलेल्या महिलेने छेड काढल्याची तक्रार देण्याची धमकी देत पैशाची मागणी केली. दरम्यान, संबंधीत शेतकऱ्याने नगर तालुका पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली. फिर्याद दाखल होताच नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी तत्काळ पथक सोबत घेऊन पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण ,महिला पोलीस नाईक गायत्री धनवडे ,पोलीस कॉन्स्टेबल राजू खेडकर,पोलीस कॉन्स्टेबल सुभाष थोरात,पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी खरात,
कॉन्स्टेबल कमलेश पाथरूड पथक सोबत घेऊन तत्काळ संबंधित महिलेचा ठाव ठिकाणा शोधून कौडगाव शिवारातून सविता बाळासाहेब मगर (रा. तपोवन रस्ता, सावेडी, नगर महिलेला जेरबंद केले.
नगर तालुका पोलिसांनी महिला न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
पाथर्डी तालुक्यातील एका शेतकऱ्याने बुधवारी नगर तालुका पोलिसात फिर्याद दिली होती. शेतकरी सकाळी त्याच्या चारचाकी वाहनातून नगर-पाथर्डी रस्त्याने जात असताना साडे दहाच्या सुमारास कौडगाव (ता. नगर) शिवारात त्यांना सविता मगर हिने लिप्ट मागितली होती. आपण जांब कौडगाव येथे प्राथमिक शाळेवर शिक्षिका आहे, असे सांगितले होते.फिर्यादीने त्याच्या चारचाकी वाहनातून कौडगाव येथून सविता मगर हिला पावणे अकराच्या सुमारास जांब फाटा येथे सोडले. संबंधित महिलेने फिर्यादीकडे शाळेतील स्वयंपाक करणाऱ्या महिलेला पैशाची गरज असल्याने २ हजार रूपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे दिले. मगर हिने दिलेले पैसे परत न करता तू माझी छेड काढली असे म्हणून आरडाओरडा करून दमदाटी तुझ्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तुझ्या विरोधात तक्रार देणार असून तक्रार द्यायची नसल्यास तु मला आणखी २ हजार रूपये दे, असे म्हणून फिर्यादीकडे खंडणीची मागणी केली. दर फिर्यादी यांनी नगर तालुका पोलिसांत याची माहिती दिली. पोलिसांनी सविता मगर विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. महिलेला अटक केल्यानंतर तिच्याकडून मुद्देमाल २ हजाराची रक्कम हस्तगत केली .
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख,पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण ,महिला पोलीस नाईक गायत्री धनवडे ,पोलीस कॉन्स्टेबल राजू खेडकर,पोलीस कॉन्स्टेबल सुभाष थोरात,पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी खरात,कॉन्स्टेबल कमलेश पाथरूड तसेच अहमदनगर दक्षिण मोबाईल सेल विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे ,राहुल गुंडू यांच्या पथकाने कारवाई केली
पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी खरात हे करीत आहेत.
( नगर - कौडगाव ते पाथर्डी रोड ने नगर तालुका पोलिसांच्या हद्दीमध्ये अशाप्रकारे महिलेने लिफ्ट चा बहाणा करत खंडणी व ब्लॅकमेलिंग केली असेल तर नागरिकांनी रीतसर नगर तालुका पोलिसांशी संपर्क करावा असे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी नगर तालुका पोलीस हद्दीतील नागरिकांना केले )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा