कामरगाव येथे गणेश उत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन.
नगर ( हेमंत साठे):- गणेश उत्सव म्हटल की आनंद, उत्साह...संगीत,नृत्य, तसेच सांस्कृतिक, धार्मिक विविध कार्यक्रमांचे गणेश मंडळाकडून आयोजन केले जाते. परंतु या व्यतिरिक्त सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून नगर तालुक्यातील कामरगाव येथील जय बजरंग युवा प्रतिष्ठान मधील तरुणांनी गणेश उत्सवादरम्यान रक्तदान शिबीराचे आयोजन करत तरुणांपुढे एक आदर्श ठेवला.
दिनांक २७ सप्टेबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत जनकल्याण रक्तपेढी नगर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कामरगाव येथे केले होते. गणेश उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या रक्तदान शिबीरामधे ग्रामस्थ व तरूणांनी मोठया प्रमाणात रक्तदान करत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.
आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कामरंगाव प्राथमिक आरोग्यकेंद्र चास वैद्यकीय अधिकारी डॉ. निवेदिता माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. बापूसाहेब नागरगोजे , आरोग्यसेवक संतोष सुरवसे, परिचरिका अकोलकर व सर्व आशा सेविका यांच्या सहभागातून उपकेंद्र कामरगाव येथे जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबीराचे आयोजन जय बजरंग युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप लष्करे मनोजकुमार ठोकळ , स्वप्निल ठोकळ, सुरज ठोकळ, मिथुन गुंजाळ,संकेत वेताळ,राहुल गुंजाळ, विलास लष्करे, अक्षय कोल्हे, अमोल वेताळ,सूरज खोदडे, राहुल वेताळ, दिपक वेताळ, निखिल गुंजाळ, अविनाश वेताळ, सोहम कुसाळकर,महेश वेताळ, रोहन गुंजाळ, सागर वेताळ,रणजित गुंजाळ, अक्षय गुंजाळ,मंगेश लष्करे, मंगेश वेताळ, वसंत गुंजाळ यांच्या सहकार्यातून करण्यात आले होते.
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा