शेतकऱ्यांच्या मोटर केबल चोरणारे चोरटे जेरबंद ! स.पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने बीड जिल्ह्यातून केले आरोपी जेरबंद !
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक १९/०९/२०२३ रोजी फिर्यादी नामे बाळासाहेब सखाराम तळुले वय ४५ वर्ष धंदा- शेती रा निमगाव घाणा ता. जि. अहमदनगर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, दि. १८/०९/२०२३ रोजी रात्री १०.३० वा चे सुमारास ते दि. १९/०९/२०२३ रोजी सकाळी ०८.३० वा चे दरम्यान निमगाव घाणा येथील एरोगेशनच्या तलावात टाकलेल्या इलेक्ट्रीक पाण्याच्या मोटरीच्या २४,८००/- रु किंमतीच्या श्री फेस केवल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे. वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की. सदरचा गुन्हा हा १ ) अंबादास महादेव घुले, २) रामेश्वर भास्कर घुले, दोन्ही रा. कारखेल ता. आष्टी जि.बीड यांनी केला असून ते कारखेल येथ असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना मा. पोलीस अधीक्षक सो अहमदनगर यांचे आदेशाने कारखेल जि.बीड येथे पाठविले. सदर पोलीस पथकांनी कारखेल जि. बीड येथुन सदर आरोपींना सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अंबादास महादेव घुले वय ३६ वर्ष २) रामेश्वर भास्कर घुले वय ३२ दोन्ही रा. कारखेल ता. आष्टी जि.बीड असे सांगीतले. सदर आरोपीनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचेकडुन सदर गुन्हयात चोरी केलेला २४,८००/- रु किमतीच्या पाण्याचे मोटारचे केवल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच त्यांनी निमगाव घाणा व नांदगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या मोटरीच्या केबल चोरी केल्याचे कबुल केले आहे.
आरोपी १) अंबादास महादेव घुले वय ३६ वर्ष २) रामेश्वर भास्कर घुले वय ३२ दोन्ही रा. कारखेल ता. आष्टी जि.बीड यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) एमआयडीसी पोस्टे, अहमदनगर गुरनं. ८६९ / २०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे. २) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि नंबर ८६१/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे.
सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे , अपर पोलीस अधीक्षक. अहमदनगर, श्री. संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी. नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई राजेंद्र गायकवाड, पोसई दिपक पाठक, पोसई योगेश चाहेर, पोहेकॉ गणेश कावरे, पोहेकॉ नितीन उगलमुगले, पोना साबीर शेख, पोना पालवे, पोकों किशोर जाधव, पोशि राजेश राठोड, पोशि नवनाथ दहिफळे, पोकों/सुरज देशमुख, पोकों सचिन हरदास तसेच मोबाईल सेल अहमदनगरचे मपोना / १६५६ रिंकु मढेकर, पोकों / राहुल गुंडु, पोकों / २४३५ नितीन शिंदे यांचे पथकाने केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा