कामरगाव येथील कामक्षा माता सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न !
नगर( हेमंत साठे):- तालुक्यातील नगर पुणे महामार्गालगत असलेल्या श्री क्षेत्र कामरगाव येथे कामक्षा माता सप्ताहाचे आयोजन मोठया उत्साहात करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता दि ५ सप्टेबर रोजी काल्याच्या किर्तनाने करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सालाबादप्रमाणे यावर्षी देखील कामक्षा माता सप्ताहाचे आयोजन दि २९ ऑगष्ट ते ५ सप्टेबर या कालावधीत करण्यात आले होते. सप्ताह काळात मोठ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कामरगाव ग्रामस्थ व भाविकांकडून करण्यात आले होते. पहिल्या दिवसापासून ते काल्याच्या किर्तनापर्यंत नामांकित किर्तनकारांची किर्तन सेवा होती. दररोज पारायण पठण, हरिपाठ, भाविकांना नाष्टा, पंगत, काकड आरती, सायंकाळ आरती असे विविध कार्यक्रम सप्ताह कालावधी मधे होते. सातव्या दिवशी ४ सप्टेबर रोजी कामक्षा मातेचा पालखी सोहळा पार पडला.
{कामक्षा माता पालखी सोहळयाचा व्हिडिओ पाहा..👆🏻}
यावेळी भगव्या पताका हाती घेतलेले भाविक, टाळ मृदुंगाच्या गजरात रममाण झालेले बालगोपाळ व तरुण तर कामक्षा मातेचा महिमा वर्णन करणारे भक्तीगीत गाणारा महिला वर्ग यामुळे पालखी सोहळ्याचे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
सप्ताह काळात काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
काल्याच्या किर्तना वेळी मा.मंत्री व जिल्हा बँकेचे विदयमान अध्यक्ष शिवाजी कर्डिले हे उपस्थित होते. मा.मंत्री. कर्डिलेंच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली.
यावेळी त्यांनी उपस्थित राहून भाविक व ग्रामस्थांना संबोधित केले.
काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कामरगाव सह पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अशा प्रकारे कामक्षा माता सप्ताह सोहळा मोठया उत्साहात पार पडला.
या सप्ताह सोहळ्यासाठी कामरगाव ग्रामस्थ, भाविक, कामक्षा माता ट्रस्ट, तसेच सचिव तथा माजी सैनिक संदीप गुंजाळ, कामक्षा माता महिला मंडळ व कामरगाव येथील आजी माजी सैनिक संघटना , गावातील आजी माजी ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटी पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा