खासदार.डॉ.सुजय विखे पाटील व मा.आमदार शिवाजी कर्डिलेंच्या संकल्पनेतून कामरगाव व परिसरातील महिला भाविकांना मोफत देवदर्शन !

 

नगर ( प्रतिनिधी):- तालुक्यातील कामरगाव व परिसरातील 500 महिला भाविकांना खा.डॉ.सुजय विखे पाटील व मा. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या संकल्पनेतून श्री.क्षेत्र शिर्डी व श्री. क्षेत्र शनी शिंगणापूर मोफत दर्शन घडविण्यात आले.

       याबाबात सविस्तर माहिती अशी की, नगर दक्षिण चे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व मा. आमदार शिवाजी कर्डिले यांनी नगर तालुक्यातील प्रत्येक गावातील  महिला भाविकांना शिर्डी व शिंगणापूर देवदर्शन घडविण्यात येत आहे. 13 सप्टे 23 बुधवारी कामरगाव परिसरातील महिलांना देवदर्शन यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मा. आमदार शिवाजी कर्डिलेंनी उपस्थित राहून सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. 


        खासदार डॉ. सुजय विखे पाटील व. मा.आमदार शिवाजी कर्डिलेंच्या संकल्पनेतून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. सुव्यवस्थित बससेवा, महिला भाविकांना ठिकठिकाणी चहा, नाष्टा , जेवणाची सोय करण्यात आली होती. प्रत्येक महिला भाविकाला सुरक्षितता व सुव्यवस्थित देवदर्शन होण्यासाठी पास देण्यात आले होते. यावेळी  कामरगाव व परिसरातील  महिला भाविकांनी देवदर्शनासाठी करण्यात आलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले.

      कामरगाव मधील विद्यमान ग्रा.पं.सदस्य लक्ष्मणराव ठोकळ मित्रपरिवार व सोसायटी चेअरमन सुनिल चौधरी, व्हा. चेअरमन राजू राजगुरु, सर्व संचालक, ग्रा.पं. सदस्य. तसेच मा. चेअरमन शिवाजी साठे, मा.उपसरपंच अनिल आंधळे, मा.मुख्याध्यापक सुदाम ठोकळ, प्रगतीशिल शेतकरी गोरख साठे, ग्रा.पं. सदस्य जिजाबाई ठोकळ, कपिल ठोकळ यांच्या सह सोसायटी संचालक, ग्रा.पं. सदस्य व कामरगाव ग्रामस्थांनी या दर्शन यात्रेचे स्थानिक पातळीवरील नियोजन केले होते.

📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !