पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा एम.आय.डी.सी. पोलीसांनी लावला २४ तासात शोध !
नगर( प्रतिनिधी):- एमआयडीसी परीसरातून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासाचे आत एम आय डी सी पोलीसांनी शोध घेवून मुलीला पालकांचे स्वाधीन केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक २७/०९/२०२३ रोजी चेतना कॉलनी नवनागापुर ता. जि. अहमदनगर येथील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, दिनांक २७/०९/२०२३ रोजी सकाळी ११/०० वा चे सुमारास चेतना कॉलनी नबनागापुर येथुन त्यांची अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरून एमआयडीसी पोस्टे गुन्हा रजि नंबर ८९४ / २०२३ भादवि ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती
मिळाली की, सदरची अल्पवयीन मुलगी हि शेंडी बायपास रोड एमआयडीसी अहमदनगर येथे आहे. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन गोपनिय माहितीच्या आधारे सदर अल्पवयीन मुलीचा शोध घेवून सदर मुलीस तिचे आईवडील यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोसई टिक्कल हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब अपर पोलीस अधीक्षक. अहमदनगर, श्री. संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी.नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई पोपट टिक्कल, पोसई दिपक पाठक, पोसई राजेंद्र गायकवाड, पोना विष्णू भागवत, पोकॉ नवनाथ दहिफळे पोका किशोर जाधव मपोकॉ सोनिया पारधे यांचे पथकाने केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा