हॉटेल मधील कामगारांना दहशत करुन गंभीर जखमी करणारे पाच आरोपी भिंगार कॅम्प पोलीसांनी केले गजाआड !

 


 नगर(प्रतिनिधी):- तालुक्यातील भिंगार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका हॉटेल मधील कामगारांना दहशत करुन गंभीर दुखापत करणारे पाच आरोपी भिगांर कॅम्प पोलीसांनी कारवाई करत गजाआड केले आहेत.

       याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 13/09/2023 रोजी दुपारी 01/45 वाजे च्या सुमारास हॉटेल प्रकाश येथे जेवण करण्यासाठी आलेला सचिन शिंदे व सोबत 7 अनोळखी इसम यांच्यात जेवण करीत असताना आपसात मोठमोठ्याने आरडाओरड करुन भांडणे चालू होती. त्यावेळी हॉटेल मधील कामगार हे सचिन शिंदे व अनोळखी सात इसमांना भांडण करु नका असे सांगत असताना यातील आरोपी सचिन शिंदे यांने हॉटेल मधील वेटर याच्या डोक्यात सोडा वॉटरची बाटली मारुन गंभीर दुखापत केली व इतर अनोळखी सात इसमानी हॉटेल मधील इतर कामगारांना मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली त्यावरुन हॉटेल प्रकाश चे मॅनेजर सुनिल संभाजी गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पो स्टे येथे गुर नं 596/2023 भा दवि कलम 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

        सदर गुन्ह्याचा तपास करताना सपोनी दिनकर मुंडे यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदर चा गुन्हा हा 1) राहुल साहेबराव शिंदे रा. साई नगर, माधवबाग, भिगांर 2) आकाश संजय पवार रा. ब्रम्हतळे, नागरदेवळे 3) निखील अश्विन घोरपडे रा. भुमेश्वर कॉलनी, भिंगांर 4) राहुल अनिल शिंदे रा. श्रीराम कॉलनी, भिंगांर 5) राहुल उत्तम काळे रा. महेश नगर, भिगार यांनी केला असून ते वडारवाडी भागात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि मुंडे यांनी भिगांर कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथक यांना सदरची माहिती देऊन तात्काळ वडारवाडी, भिगांर भागात पाठवले. सदर तपास पथकाने सापळा रचून पाच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पो स्टे चे सहा. पोलीस निरीक्षक श्री दिनकर मुंडे, सफी कैलास सोनार, पोहेकॉ गोविंद गोल्हार, पोहेकॉ संदीप घोडके, पोहेकॉ दहीफळे, पोना दिलीप शिंदे, पोकॉ अमोल आव्हाड यांनी सदरची कारवाई केली आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !