कराटे स्पर्धेमधे कामरगाव मधील विदयार्थ्यांचे घवघवीत यश !
नगर (हेमंत साठे):- अहमदनगर शो तोकोन डो असोशिएशनच्या खेळाडूंनी सावेडी येथे झालेल्या सब ज्युनिअर कॅडेट ज्युनिअर व सिनिअर मुलामुलींच्या स्पर्धेमधे उत्कृष्ट प्रदर्शन करून पदकाची कमाई केली.
कामरगाव येथील कराटे खेळाडूनी 3 सुवर्ण, ३ रौप्य, व ७ कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धत जिल्ह्यातील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.
या कराटे स्पर्धामधे कामरगाव जिल्हा परिषद शाळेच्या ३ खेळाडूनी सहभाग घेतला त्यापैकी वैष्णवी ठोकळ हीने सुवर्ण, सार्थक साठे याला सुवर्ण व कास्य तर आदेश चौधरी रौप्य व कास्य पदक पटकाविले.
कामरगाव इंग्लिश स्कुल मधील ६ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यापैकी धनश्री कापरे हीला सुवर्ण व रौप्य तर आज्ञा चौधरी रौप्य व कास्य, साईराज चौरे कास्य पदक, सुजल जाधव कास्य पदक, प्राजंल पाडेकर कास्य, सार्थ सोनवणे कास्य पदक , अशा प्रमाणे खेळाडूंनी पदके मिळवत घवघवीत यश मिळवले.
क्रीडा प्रशिक्षक सुरेश जाधव म्हणाले की, शिक्षणासोबत खेळाला देखील महत्व आले आहे. अनेक मुला मुलींनी खेळातून आपले करिअर घडवले आहे. सध्याच्या युगात समाजात अपप्रवृत्तींना प्रत्युत्तर देण्यासाठी व स्वसंरक्षणासाठी कराटे तायक्वांदो मुला मुलींसाठी प्रभावी आहे. स्वसंरक्षणासाठी विद्यार्थ्याना आमच्या मार्गदर्शनाखाली लाठी काठी शिवकालीन प्रशिक्षण दिले जाते.
यावेळी खेळाडूंना बाबुसकर सर, सरफराज सय्यद सर, क्रीडा प्रशिक्षक सुरेश जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धामधे कामरगाव मधील खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबदृदल यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा