कामरगावचे युवा नेते गणेश साठे यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा सामाजिक उपक्रम.; वाढदिवसाच्या अनाठायी खर्चाला फाटा देत नवा सामाजिक आदर्श !
नगर (प्रतिनिधी) :- आजकाल वाढदिवस म्हटल की चमकोगिरी, डिजेचा दणदणाट,अनाठायी खर्च, करण्याची वृत्ती एकीकडे वाढत असतांना दुसरीकडे सामाजिक भावनेतून वाढदिवसानिमित्त आपल्या आनंदात सहभागी करून चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा करण्याच उदाहरण समाजात तसं क्वचितच पाहायला मिळत. असाच एक नवा सामाजिक उपक्रम कामरगावचे युवा नेते तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश रावसाहेब साठे यांनी राबविला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कामरगावचे युवा नेते गणेश साठे यांनी आपला वाढदिवस साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपत, गावातील व पंचक्रोशितील आपल्या युवा सहकऱ्यांसोबत ज्या प्राथमिक शाळेत शिकलो त्या शाळेप्रती आपली सामाजिक जाणीव ठेवून त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या रंग रंगोटीसाठी व विकास कामांसाठी जी निधीची अडचण येत होती. याची माहिती मिळाल्यानंतर त्यासाठी सर्व सत्कार, शुभेच्छा व अनाठायी खर्च टाळून ११०००/- रुपये रोख मदत केली. त्यांच्या या मदतीमुळे शाळा विकासासाठी मदत झाली असून वाढदिवसाच्या अनाठायी खर्चाला फाटा देत एक नवा सामाजिक उपक्रम राबवत आदर्श निर्माण केला आहे.
या प्रसंगी युवा नेते गणेश साठे यांनी जि.प. शाळा कामरगावच्या चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी जि.प. शाळेच्या चिमुकल्यांनी देखील गणेश साठे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी देखील त्यांनी सामाजिक उपक्रम व कामे केली असल्याचे सांगितले .तसेच शाळेसाठी केलेेल्या् छोट्याशा मदतीने देखील आत्मिक समाधान मिळाल्याची भावना गणेश साठे यांनी व्यक्त् केली.
यापुढेे देखील दरवर्षी वाढदिवसाला आपला सत्कार टाळून गावातील सामाजिक कामाला हातभार लावणार असल्याचा संकल्प गणेश रावसाहेब साठे यांनी यावेळी व्यक्त केला.
ज्या जिल्हा परिषद मराठी शाळेत शिकलो. त्या शाळेचे ऋण व्यक्त करण्याकरिता तसेच शाळा विकासासाठी माझ्या वाढदिवसाचा अनाठायी खर्च न करता शाळेसाठी छोटीशी मदत केली. इतर युवकांनी देखील वाढदिवस व इतर ठिकाणी होणारे अनाठायी खर्च टाळून जिल्हा.परिषद शाळेला व इतर सामाजिक कार्यात मदत करावी.(गणेश साठे :- युवानेते तथा ग्रा.पं.सदस्य कामरगाव)
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा