सुपा ग्रामपंचायत CCTV यंत्रणा बसवणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ! सुपा गावावर आता नजर ठेवणार तिसरा डोळा !; वाढत्या गुन्हेगारीला व चोरीला चाप बसविण्यासाठी सुपा सरपंच व पदाधिकाऱ्यांचा कौतुकास्पद निर्णय !

पारनेर (हेमंत साठे)-:- सुपा औदयोगिक वसाहत व जापनीज पार्क मुळे राज्यात नावारूपाला आलेले गाव म्हणजे पारनेर तालुक्यातील सुपा गाव. MIDC परिसर व गावातील वाढत असलेल्या वसाहती मुळे सुपा ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्यांनी गावाच्या सुरक्षिततेची काळजी घेत एक अभिनव निर्णय घेतला तो म्हणजे संपूर्ण सुपा गावात CCTV यंत्रणा बसविण्याचा. हा स्तुत्य उपक्रम हाती घेत थोड्या कालावधीत संपूर्ण गावात CCTV यंत्रणा बसविण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील  सुपा ग्रामपंचायत तालुक्यातील पहीली सी.सी.टीव्ही लावणारी  ग्रामपंचायत ठरली असून आता गावातील नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुपा गावावर CCTV रूपाने तिसऱ्या डोळयाची नजर राहणार आहे.

या निर्णयामुळे वाढत्या गुन्हेगारीला व चोरीला चाप बसणार असून गावातील नागरीकांची सुरक्षितता राहणार आहे.

         या CCTV यंत्रणा उद्घाटन प्रसंगी औद्योगिक सुपा गावच्या सरपंच सौ. मनिषा योगेश रोकडे, सुपा पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, मा. उपसरपंच दत्तानाना पवार, उद्योजक योगेश रोकडे, सेवा सोसायटी चे चेअरमन दिलीप पवार, ग्रा पं. सदस्य पप्पुशेठ पवार, ग्रा.पं.सदस्य कानीफ पोपळघट, ग्रा पं सदस्य अनिता पवार ,ग्रा पं सदस्य प्रताप शिंदे ग्रा.पं.सदस्य सुरेश नेटके सोसायटी संचालक सुनिल पवार सोसायटी, सोसायटी संचालक राहुल पवार, संचालक अशोक येणारे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पवार, अरुण काका ठोकळ विठ्ठल पवार, सिद्धार्थ पवार ,वैभव काळे,  भाऊ पवार, संतोष सरोदे, दादा टोणगे, बाप्पु सोनुळे, विशाल  ठुबे, श्रेयश थोरात, जब्बार भाई, दादा जाधव, संचित मगर, जि.प.शाळा सुपा मुख्याध्यापक भिवसेन पवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष मार्तंड बुचुडे सर, पत्रकार सुरेंद्र शिंदे. यांची उपस्थिती होती. 

याप्रसंगी सुपा  गावातील नागरीकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत CCTV यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सुपा  गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे व सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्यांचे परिसरातून व ग्रामस्थांकडून कौतुक  होत आहे.

वाढत्या गुन्हेगारी चाप बसावा म्हणून सुपा गावातील नागरीकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत CCTV यंत्रणा बसविण्याचा निर्णय सर्व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून घेतला.

(सौ.मनिषा योगेश रोकडे .सरपंच .सुपा)


📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !