खाजगीकरण विरोध व जुनी पेन्शन योजना मागणीसाठी दिल्लीत सरकारी कर्मच्याऱ्यांचा एल्गार ! नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कर्मच्याऱ्यांचा शंखनाद आंदोलनात सहभाग !
( प्रतिनिधी:-हेमंत साठे):- दिनांक 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीत रामलीला मैदान ठिकाणी *nmops* व *mrjps* महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्यावतीने खाजगीकरण व जुनी पेन्शन योजना बंद केल्यामुळे केंद्र सरकार विरोधात शंखं नाद आंदोलन करण्यात आले. संपूर्ण देशभरातून खाजगीकरणाला कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे हा संताप दिल्ली या ठिकाणी रामलीला मैदानावर कर्मचाऱ्यांनी एकजुटीने दाखवला. रामलीला मैदानावर संपूर्ण देशातून आठ लाख कर्मचारी उपस्थित होते.
दिल्ली येथून शिक्षक नेते राजेंद्र ठोकळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र मधून जवळजवळ 20ते25 हजार कर्मचारी दिल्ली या ठिकाणी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यामधून या आंदोलनासाठी दोनशे कर्मचारी उपस्थित होतेयावेळी पेन्शन संघटनेचे राज्य नेते राजेंद्र ठोकळ यांनी राज्याच्यावतीने आंदोलनाला संबोधित केले. शिक्षक नेते राजेंद्र ठोकळ यांनी सांगितले की या आंदोलन चा हेतू भारत हे राष्ट्र संविधानावर चालणारे राष्ट्र आहे परंतु या सरकारने संविधान मोडीत काढली आहे कर्मचाऱ्यावर अन्याय करणारे अनेक शासन निर्णय या सरकारच्या काळात लागू झाले.
खाजगीकरण करून शासन आपले कर्तव्य विसरत आहे प्राथमिक शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे तरीसुद्धा खाजगी कंपन्यांच्या ताब्यात पूर्ण शिक्षण व्यवस्था देण्याचा घाट या शासनाने घातलेला आहे.
अनेक शाळा बंद करण्याचे धोरण शासनाने घेतलेली आहे .शिक्षणाचे जर खाजगीकरण झाले तर गोरगरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील त्यामुळे कसलेही परिस्थितीत खाजगीकरण होता कामा नये.शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अतिशय तीव्र भावना आहेत.2005 नंतरचे कर्मचाऱ्यांची शासनाने जुनी पेन्शन योजना बंद केली शेअर मार्केट वर आधारित नवीन nps योजना सुरू केली ति शेयर मार्केट वर आधारित आहे अतिशय घातक योजना व बेभरोशाचे योजना आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे भविष्यअंधार मय झाले आहेअनेक सरकारी कार्यालया मध्ये खाजगीकरण सुरू केले
जिल्ह्यामधून राज्य नेते राजेंद्र ठोकळ जिल्हाध्यक्ष नाना गाढवे जिल्हा नेते प्रवीण झावरे जिल्हा नेते देवेंद्र आंबेडकर जिल्हा सरचिटणीस शिव भुजबळ मार्गदर्शक विकास खेबडे पारनेर तालुका अध्यक्ष बाबा धरण सचिन गाडिलकर पांडुरंग भगत संगमनेरचे नेते प्रदीप बागुल जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे नेते अभय गट मनोज चोबे राज्य सरचिटणीस जोरवेकर साहेब शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे सरचिटणीस गणेश वाघ किशोर शिंदे विकास साळूंके विलास वाघ संदीप वाघमारे आदी पदाधिकारी व पेन्शन शिलेदार उपस्थित होते
आंदोलनास आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे राज्य नेते श्री राजेंद्र ठोकळ व जिल्हाध्यक्ष श्री नाना गाढवे यांनी आभार व्यक्त केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा