सकल मराठा समाजाच्या मोफत वधू वर मेळाव्याचा लाभ घ्यावा- मा. नगराध्यक्ष पोटे ; सकल मराठा समाज व मराठा सोयरिक संस्थेचा उपक्रम

 नगर(प्रतिनिधी):- सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या वतीने श्रीगोंदा शहरात मोफत मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 श्रीगोंदा शहरामध्ये पंतनगर, कम्युनिटी हॉल,शनी चौक श्रीगोंदा, जि.अ.नगर सकाळी 10 ते 2 या वेळेत होणार आहे. या मोफत मेळाव्याचा जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील वधू-वर पालकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मा. नगराध्यक्ष मनोहर पोटे व मराठा सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी केले आहे.

  आजकाल लग्न जमविण्यासाठी नातेवाईक, भाऊबंद , मामा यांना कुणालाही वेळ मिळत नाही . तसेच स्थळ मिळवणे फार कठीण समस्या होऊन बसली आहे . म्हणून अशा वधुवर मेळाव्याची गरज भासू लागली आहे . हा मेळावा मोफत आहे . मेळाव्याला स्वतः वधू वरांनी येणे गरजेचे आहे . मेळाव्यासाठी येताना एक बायोडाटा व फोटो आणावा . यामध्ये वेगवेगळ्या जिल्हयातील व तालुक्यातील आपल्याला आवडीप्रमाणे स्थळ समक्ष पाहता येणार आहेत.

  आतापर्यंत मराठा सोयरिक संस्थेमार्फत 3000 लग्न जमलेले आहेत.त्यापैकी साडेपाचशे लग्न हे विधवा विदुर घटस्फोटीत यांचे जमलेले आहे. धर्मादाय कार्यालयात नाव नोंदणी केलेली ही जगदंब फाउंडेशन अंतर्गत विश्वसनीय संस्था आहे. हा ७६ वा मोफत मेळावा आहे. अधिक माहितीसाठी ७४४७७८५९१० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा भारती इंगवले, शिक्षक संघाचे नेते आबासाहेब जगताप, श्रीगोंदा पंचायत समिती माजी सदस्या कल्याणी लोखंडे, सागर मोरे, डी एम शिंदे, जयवंत  सरोदे, लालासाहेब जाधव, उज्वला शेळके, ताई पवार, मधुकर रसाळ, नितीन घालमे, अविनाश निंभोरे, प्रवीण बेलदार, प्रा. योगेश कोतकर, जयश्री कुटे, अंजना पठारे यांनी केले आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !