सुपा MIDC तील कंपनीच्या केमिकल युक्त पाण्यामुळे सुपेकरांचे आरोग्य धोक्यात.


नगर ( प्रतिनिधी):- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नगर पुणे महामार्गालगत असणाऱ्या जुन्या सुपा एम आय डीसीतील  ऑरगॅनिक्स कंपनीतून सोडलण्यात आलेल्या केमिकल युक्त पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके जळाली आहेत. तसेच नजीकच असणाऱ्या व सुपा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केमिकल युक्त पाणी मिसळल्यामुळे तलावातील अनेक मासे मृत्युमुखी पडल्याची माहिती उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे, माजी उपसरंपच दत्ता ना ना पवार, माजी उपसरपंच सागर मैड व इतर पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी तलावात केमिकलयुक्त पाणी मिसळून मासे मृत्युमुखी पडल्याचे आढळले. या तलावा सोबतच इतर खाजगी विहिर व बोअरवेलमधे केमिल युक्त पाणी गेल्याची शक्यता झाल्याने प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत व नागरीकांच्या आरोग्याबाबत दक्षता म्हणून आरगॅनिक्स कंपनीच्या केमिल युक्त पाण्यामुळे सुपेकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता  असल्याने सुपा ग्रामपंचायत कडून तात्काळ गावाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तसेच ऑरगॅनिक्स कंपनीच्या व्यवस्थापनाला जाब विचारण्यात आला.  सरपंच मनिषा योगेश रोकडे यांच्याकडून कंपनीला केमिकल युक्त पाणी ओढया मधे सोडणे तात्काळ बंद करण्यात यावे यासाठी निर्देश देण्यात आले. 


       ऑरगॅनिक कंपनीच्या केमिकल युक्त पाण्यामुळे सुपेकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने सुपा ग्रामपंचायत कडून गावचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला आहे च परंतु तलावातील पाणी पुरवठा गावाला पिण्यासाठी केला जात असल्याने  प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कंपनीतील बाहेर सोडण्यात येणारे केमिकल मिश्रीत पाणी तत्काळ बंद करण्याचे पदाधिकाऱ्यांनी कंपनी प्रशासनाला सुनावले. यापुढे असे होणार नाही असे कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजते.


        यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक योगेश रोकडे, माजी उपसरपंच दत्ता ना ना पवार, माजी उपसरंपच सागर मैड, सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, उपसरपंच विजय पवार, सेवा संस्येचे अध्यक्ष दिलीप पवार, मनसेचे अविनाश पवार, सुनील पवार, नंदू पवार, राहुल पवार, नितीन दळवी, बाळू मगर यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !