मंगळसूत्र चोरास मुद्देमालासह अटक ! श्रीरामपुर शहर पोलीसांची धडक कारवाई !

अहमदनगर:- दिनांक 18/10/2023 रोजी सांयकाळी 07/00 वा.चे सुमारास फिर्यादी डॉ. सरोज विनायक मोरगे, रा.मोरगे हॉस्पीटल, श्रीरामपूर या, सुभाष कॉलनी, वार्ड नं. 06, श्रीरामपूर येथे डॉ.पटारे मॅडम यांच्या वाढदिवसाकरीता आल्या होत्या. वाढदिवस झाल्यांनतर रात्री 08/15 वा.चे सुमारास घरी जाण्याकरीता निघाल्या तेव्हा त्यांना डॉ.पटारे यांच्या हॉस्पिटल समोर रोडवरती वॉर्ड नं. 06, श्रीरामपूर येथे त्याच्या इतर मैत्रिणी डॉ. स्फुर्ती जयसवाल, डॉ. नेहा बैरागी, डॉ. सरीता देशपांडे, भेटल्याने त्यांच्या सोबत रोडवर बोलत उभे राहिल्या तेव्हा अचानक काळे रंगाच्या मोटार सायकलवर दोन अनोळखी मुले आले व गाडीचा वेग कमी केला व माझ्या गळयातील 98,007/- रु.कि.चे 7.420 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व त्यामध्ये असलेले काळे मण्याची पोत तसेच रियल डायंमडचे पॅन्डल जु.वा.किं.अ. मोटार सायकलवर मागे बसलेल्या मुलाने बळजबरीने हिसकावुन घेवुन भरधाव वेगात निघुन गेले वगैरेच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पो. स्टे. गुरनं. 1128/2023 भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना पोनि. हर्षवर्धन गवळी यांना सदर गुन्हयातील मोटारसाकलवर पाठीमागे बसलेला आरोपी नामे हैदर इराणी रा. वार्ड नं. 02, श्रीरामपूर, हा त्याचे राहते घरी येणार असल्याची गोपणीय माहिती मिळाल्याने पोनि. हर्षवर्धन गवळी यांनी सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके व तपास पथकास सदर आरोपीस ताब्यात घेण्याचे तोडी आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ सदर परिसरात सापळा लावनु तो घरी येताच त्यास ताब्यात घेतले व त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव हैदर मुसा इराणी, वय 27 वर्षे, रा. श्रीरामपूर कोर्ट समोर, इराणी गल्ली, वार्ड नं. 01, श्रीरामपूर जि. अहमदनगर. असे असल्याचे सांगितले. सदर गुन्हयाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा साथिदार नामे वसिम युसुफ इराणी, रा. इराणी चाळ, परळी, जि. बिड याचे सोबत मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली व अटक कालावधीत त्याच्याकडुन खालील वर्णनाचा मुद्देमाला जप्त करण्यात आला.

1)45,000/- रु.किं.ची 7.420 ग्रॅम वजनाची एक सोन्याची लगड, सुभाष कॉलनी पटारे यांच्या हॉस्पिटल समोर रोडवरती वॉर्ड नं. 06, श्रीरामपूर येथुन चोरलेल्या मंगळसुत्राची. गुरंन. 1128/2023 भादंवि 392, 34 प्रमाणे दाखल गुन्हयातील.

2)35,000/- रु.कि.ची 10.800 ग्रॅम वजनाची एक सोन्याची लगड, रासकरनगर ममता स्विट्स समोर वॉर्ड नं.07, श्रीरामपूर येथुन चोरलेल्या मिनी गंठणची गुरनं. 1070/2023 भादंवि कलम 392,34 प्रमाणे दाखल गुन्हातील.

3)1000/- किंमतीचे एक L8 GOLD FLAME या नावाचे सोन वितळण्याचे छोटे मशिन जुवाकिंअं. 4)50/- रु. किंमतीचा एक सवागीचा छोटा तुकडा जुवाकिंअं.

81,050/- एकूण.

वरील वर्णनाचा दोन गुन्हयातील मुद्देमाल त्याच्याकडुन जप्त करण्यात आला असुन सदरचे दोन्ही गुन्हे तात्काळ उघडकीस आणले आहे यापुर्वी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशने येथे दाखल असलेले गुन्हे खालील प्रमाणे.

अ.क्रं. पोलीस स्टेशन गुरनं. व कलम 1श्रीरामपूर शहर पो.स्टे

गुरनं. 253/2015 भादंवि क 392,34 प्रमाणे

आरोपी नाव व पत्ता

हैदर मुसा इराणी, वय 27 वर्षे, रा. श्रीरामपूर कोर्ट समोर, इराणी गल्ली, वार्ड नं. 01, श्रीरामपूर जि. अहमदनगर.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !