अहमदनगर जिल्हा परिषद अधिकारी अॅन्टी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडला !
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
by HRS News Marathi
नगर( प्रतिनिधी):- मिळालेल्या माहितीनुसार नगर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचा अधिकारी नगर अॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडला आहे. पुढील कारवाई सुरू आहे... क्रमशः
जाहिरात...👇🏻 बातमी....👇🏻 अहिल्यानगर (हेमंत साठे):- तालुक्यातील कामरगावचे सुपुत्र तथा पोलीस दलात कार्यरत असलेले उपनिरीक्षक अनिल बबन साठे यांचे सुपुत्र साहिल साठे यांनी भारतीय सैन्यदलात (Indian Navy) शॉर्ट सर्व्हिस कमिशन (ssc) या परिक्षेत यश प्राप्त केले आहे. साहिल यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट(कमिशन्ड अधिकारी) म्हणून निवड झाली आहे. साहिल अनिल साठे यांचे पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण मालवणयेथील रोझरी इंग्लिश स्कुल मधे झाले. दहावीच्या परिक्षेत साहिलने 95% गुण मिळवले. भोंसला मिलिटरी स्कुल, नाशिक येथे प्रवेश घेत बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. बारावी नंतर वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे येथे कॉम्प्युटर इंजिनिअरींग ची (BE) पदवी प्राप्त केली. साहिल हे मालवण येथे सागरी सुरक्षा दलाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल साठे व भरड नाका येथील फॅशन गॅलेक्सी के वस्त्रदालनाचे सर्वेसर्वा शीतल साठे यांचा मुलगा आहे. साहिल यांचे आजोबा बबन साठे हे भारतीय सैन्यदलात होते. ते सेवा निवृत्त (माजी) सैनिक असून साहिल यांचे वडील हे भारतीय नौदलातून सेवानिवृत्तीनंतर पोलीस दलात कार्यर...
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- तालुक्यातील कामरगाव येथील शिक्षण विभागातील माजी विस्तार अधिकारी मनसुख शेख यांचे चिरंजीव शाहरुख शेख यांची महिन्द्रा डिफेन्स. मधे प्रबंधक पदावर नियुक्ती झाली. त्यानिमित्त तसेच के एस बी कंपनीत स्टोअर मॅनेजर पदी कार्यरत असणारे अविनाश साठे यांची कन्या ऋतुजा यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागात असिस्टंट इंजिनिअर पदावर नियुक्ती झाली. कामरगावच्या या दोन्ही भूमीपुत्रांचा सत्कार कामरगांव विविध कार्यकारी सोसायटी लि. कामरगांव यांच्या वतीने दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आला . या प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक रावजीभाऊ ठोकळ, ज्येष्ठ नागरीक लक्ष्मण शेळके , प्रगतीशील शेतकरी गोरख साठे , भाऊसाहेब दळवी , मथुजी झरेकर, प्रा.संभाजी कातोरे सर व बन्सी ठोकळ, संपत ठोकळ, अंबादास रोहकले व विशाल साठे , बापू थिटे, संतोष साठे व ग्रामस्थ इ . मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . सदर कार्यक्रमाचे आयोजन चेअरमन अनिल आंधळे व व्हा. चेअरमन श्री. रमेश साठे सर, संचालक तथा मा सरपंच रावसाहेब साठे , मा चेअरमन शिवाजी साठे, मा. चेअरमन सुनिल चौधरी ...
अहिल्यानगर (हेमंत साठे):- जिल्ह्यातील नगर तालुक्यात पिंपळगाव कवडा नावाचे एक छोटेसे गाव आहे. आज जरी नगर तालुक्यात असला तरी पूर्वी हा गाव पारनेर परगण्यात होता.या गावाला मोठा ऐतिहासिक वारसा लागला आहे. गावात ठिक ठिकाणी ऐतिहासिक खुणा नजरेस पडतात. याच गावच्या प्रवेश द्वारावर म्हणजे वेशीवर एक शिलालेख कोरलेला आहे. वेशीला रंग दिलेला असला तरी शिलालेख वाचता येतो. त्याचे वाचन कामरगावचे इतिहास अभ्यासक श्री सतीश भीमराव सोनवणे यांनी केले. ते असे १.|| शके १७०६ क्रोधी नाम संवछरे|| २.||माघ वद्य त्रयोदसी ते दीवसे भ|| ३.|| बहेरो अनंत जागीरदार जोसी कुळ ४.|| कर्णी मौ पिपळगाव कवडा पा| पार ५.|| नेर लागवाड रुपय १००१ शिलालेखाचा अर्थ- शालिवाहन शकाच्या १७०६ व्या वर्षी क्रोधी नावाच्या संवत्सरात माघ वद्य त्रयोदशीला बहिरो अनंत जहागिरदार यांनी मौजे पिंपळ गाव कवडा परगणे पारनेर येथे १००१ रुपये खर्च करून वेशीचे बांधकाम केले. मिती - शके १७०६, माघ वद्य त्रयोदशी, वार सोमवार, पिले जंत्री नुसार इंग्रजी तारीख - ०७ फेब्रुवारी १७८५ शिलालेखाची लिपी - खोदीव स्वरुपाचा हा शिलालेख बाळबोध देवनागरी लिपीत आ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा